खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:07 AM2019-06-26T01:07:58+5:302019-06-26T01:08:22+5:30

बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत.

Kharif season; Seed, fertilizer samples taken by the Agriculture Department ... | खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी सुरूवात केल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. या हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत. यातील नांदेडच्या एका मिश्र खत उत्पादक कंपन्या नमुन्यांमध्ये निकष असलेले घटक आढळून न आल्याने त्या खतांची विक्री थांबवली आहे.
जालना जिल्ह्यात खरिपाचे एकणू पाच लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकरी पेरणीच्या कामांना गती आली आहे.
अनेक शेतक-यांनी नांगरणी यापूर्वीच केली होती. आता लहान-सहान गवताच्या काड्यांचा भुगा करण्यासाठी ट्रॅक्टरव्दारे रोटावेटर मारण्याच्या कामांना वेग आला असून, शेती कामांना ट्रॅक्टर मिळणे अवघड झाले आहे.
बांध बंदिस्ती करण्यासाठी जेसीबीची कमतरता देखील जाणवत आहे. दुसरीकडे दुष्काळात अनेक शेतक-यांनी आपले पशुधन हे कवडीमोल दराने विक्री केले. त्याचाही परिणाम शेतीवर होत आहे.
आज अनेकजण एकमेकांना बैलजोडी देऊन मदत करत आहेत. एक आठवडा एकाच्या तर दुस-या आठवड्यात दुस-या शेतक-यांडे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या बियाणांचे संकलन करून त्याचे नमुने हे औरंगाबाद तसेच नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, नांदेड येथील एका मिश्र खतांच्या निर्मितीच्या नमुन्यांमध्ये जे घटक खतांमध्ये असायला हवे होते. ते दिसून न आल्याने त्यांच्या खतांच्या साठ्याला विक्री बंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणनियंक एस.डी. गरांडे यांनी दिली.
शेतक-यांनी बॅच जपून ठेवण्याचे आवाहन
आज जरी पेरणी झालेली नसली तरी, चांगल्या पाऊस पडल्यावर येत्या १५ दिवसात पेरणीला वेग येणार आहे. ही पेरणी करताना शेतक-यांनी ज्या कंपनीचे बियाणे आणून खरेदी केली आहे, त्यावेळी त्या कंपनीचे नाव, त्या बियाणे पिशवीवर असलेला बॅच क्रमांक हा सांभाळून ठेवावा. जेणेकरून पेरणी केल्यावर जर त्या बियाणांची उगवण झाली नाही, त्यावेळी हा बॅच महत्वाची भूमिका निभावू शकतो. या बॅचमुळे नंतर संबंधित कंपनीविरूध्द कारवाई करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Kharif season; Seed, fertilizer samples taken by the Agriculture Department ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.