जालना बाजारपेठेत अद्रकाला ६ हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:48 AM2019-01-03T11:48:08+5:302019-01-03T11:48:33+5:30

गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल तीनशे रुपयांनी अद्रकाचा दर वाढला आहे.

Ginger gets 6 thousand rupees rate in the Jalana market | जालना बाजारपेठेत अद्रकाला ६ हजारांचा भाव

जालना बाजारपेठेत अद्रकाला ६ हजारांचा भाव

googlenewsNext

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या आठवडी बाजारात अद्रकाची आवक घटल्याने अद्रकला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल तीनशे रुपयांनी अद्रकाचा दर वाढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत जालना, तालुक्यासह विदर्भातील देऊळगावराजा, देऊळगावमही आदी, ठिकाणांहून भाजीपाल्याची आवक होते. थंडीमुळे आवक ३० ते ३५ टक्क्याने घटली आहे. अद्रकाला ६ हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला. टोमॅटो  १५० ते २०० रुपये कॅ रेट, भेंडी ३० ते ४० रुपये किलो, वाटाणे १५ ते २२ रुपये किलो, कोथिंबीर ५० ते १२० रुपये शेकडा, मेथी ५० ते १४० रुपये शेकडा, दोडके  ३० ते ४५ रुपये किलो, लसूण ८ ते १४ रुपये किलो ठोक दराने विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

Web Title: Ginger gets 6 thousand rupees rate in the Jalana market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.