लाच घेताना कृषी कर्मचारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:58 AM2019-04-03T00:58:30+5:302019-04-03T00:58:53+5:30

अनुदानाची फाईल दाखल करुन घेण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना बदनापूर येथील कृषी कार्यालयातील अनुरेखक विजय लक्ष्मण कांबळे याला मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले.

Employee arrested while taking the bribe | लाच घेताना कृषी कर्मचारी जेरबंद

लाच घेताना कृषी कर्मचारी जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अनुदानाची फाईल दाखल करुन घेण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना बदनापूर येथील कृषी कार्यालयातील अनुरेखक विजय लक्ष्मण कांबळे याला मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले.
संबंधित तक्रारदाराने कृषी विभागाच्या समृध्द शेतकरी अभियानाअर्तगत १ लाख १० हजार रुपयांचे रोटाव्हेटर खरेदी केले होते. शासनाकडून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ५० टक्के सूट देण्यात येते. याचा लाभ मिळविण्यासाठी तक्रारदाराने सर्व कागदपत्र जमा करुन कृषी अधिकारी कार्यालयात जमा करण्यासाठी आणले होते. मात्र, अनुरेखक कांबळे याने तक्रारदाराची फाईल दाखल करून घेण्यासयाठी पाचशे रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चव्हाण, संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

Web Title: Employee arrested while taking the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.