चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:32 AM2019-05-30T01:32:31+5:302019-05-30T01:33:00+5:30

पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

A bout to cater to the thirst of the citizens | चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र चरचे पाणी देखील दिवसें - दिवस कमी होत असल्याने पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
भोकरदन शहरासह २५ गावाना पाणीपुरवठा असलेले जुई धरण पाच महिन्यापासून कोरडे पडले आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने ज्या पाणीपुरवठा विहिरीना पाणी नाही अशा गावात बाणेगाव येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता मात्र गेल्या पंधरा दिवसा पासून बाणेगाव धरण सुध्दा कोरडे पडले आहे. त्यामुळे आता पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. भोकरदन नगरपरिषदेने बाणेगाव धरणाच्या परिसरातील विहिरीतून २० टँकरच्या ३ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाअधिकाºयानी दिले होेते. सुरूवातीला पाणी उपलब्ध असे पर्यंत १५ लाख लिटर पाणी शहरासाठी आले, मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून पाणी कमी झाले. त्यामुळे टँकरच्या फे-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे जिल्हाअधिकारी बिनवडे यांनी नगरपरिषदेचे पाच टँकर कमी केले आहे. आता १५ टँकर आणि व जुई धरणात खोदलेल्या चरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: A bout to cater to the thirst of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.