VIDEO - बलुचिस्तान पाठोपाठ सिंधमध्येही स्वातंत्र्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:38 AM2017-07-18T11:38:43+5:302017-07-18T11:38:43+5:30

बलुचिस्तान पाठोपाठ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे.

VIDEO - Movement for independence also followed by Balochistan in Sindh | VIDEO - बलुचिस्तान पाठोपाठ सिंधमध्येही स्वातंत्र्यासाठी आंदोलन

VIDEO - बलुचिस्तान पाठोपाठ सिंधमध्येही स्वातंत्र्यासाठी आंदोलन

Next

 ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. 18 - बलुचिस्तान पाठोपाठ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. सिंध प्रांतात नुकतेच जिए सिंध मुत्ताहिदा महाज या सिंधी संघटनेतर्फे स्वातंत्र्याच्या मागणीसाठी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बलुचिस्तानप्रमाणे सिंध प्रांतालाही पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचे आहे. या मोर्चामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या ताब्यात असलेल्या सिंधी राजकीय कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली. 
 
सिंध विद्यापीठ आणि जिल्हा प्रेस क्लबपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठया संख्येने सिंध प्रांतातील नागरीक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. स्वातंत्र्याची मागणी करणारे फलक हाती घेऊन पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संयुक्त राष्ट्र, मानवी हक्क आयोग आणि आंतरराष्ट्रीय सुमदायाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. 
 
पाकिस्तानने सिंध प्रांत बळकावला असून इथे छळवाद मांडला आहे असे मोर्चात सहभागी झालेल्या नागरीकांचे म्हणणे होते. पाकिस्तानी पोलीस आणि रेंजर्सनी या मोर्चावर लाठीमार करुन अश्रूधुराच्या नळकांडयाही फोडल्या. जिए सिंध मुत्ताहिदा महाजच्या 100 कार्यकर्त्यांनाही अटक केली. 
 
आणखी वाचा 
आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने केली आत्महत्या
उरी सेक्टरमध्ये जवानाकडून मेजरची हत्या
 
भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे - नाएला कादरी बलोच
 
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ज्या प्रमाणे पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे असे विधान बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएल कादरी बलोच यांनी केले आहे. 
 
भारताने आपल्या बलुचिस्तान संदर्भातील धोरणात बदल करावा यासाठी जनमत तयार करण्यासाठी त्यांचा भारतातील एका शहरातून दुस-या शहरात प्रवास सुरु आहे. यापूर्वीही बलुचिस्तानातील नेत्यांनी अशी मागणी केली आहे. पण भारताने या मागणीला फारसे गांर्भीयाने घेतले नाही. 
 
पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुचिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. नाएला बलुच नेत्या आहेत ज्यांना भारतात येऊन स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष बलुचिस्तानचा मुद्या मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि जगाने बलुचिस्तानच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करुन बलुचि जनतेवर पाकिस्तानकडून सुरु असलेला अत्याचार थांबवावा. 
 
अन्यथा बलुच बंडखोरांना पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारावे लागेल. आतापर्यंत बलुची जनतेने पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानकडून हल्ले होत असताना आम्ही फक्त आमचे संरक्षण करत आहोत. पण आम्ही अजून किती काळ थांबायचे ? हे युद्ध पाकिस्तानात सुरु होईल असा इशारा त्यांनी दिला. नाएला आणि तिचे कुटुंबिय कॅनडामध्ये विजनवासात रहात आहेत. 
सविस्तर वृत्त लवकरच

Web Title: VIDEO - Movement for independence also followed by Balochistan in Sindh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.