भीषण अपघात! भरधाव Ferrari चे दोन तुकडे, वृद्ध चालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:41 PM2022-12-19T19:41:50+5:302022-12-19T19:43:05+5:30

Tesla कारला ओव्हरटेक करताना Ferrari चा असा भीषण अपघात झाला.

Terrible accident! Speeding Ferrari in two pieces, old driver dies on the spot | भीषण अपघात! भरधाव Ferrari चे दोन तुकडे, वृद्ध चालकाचा जागीच मृत्यू

भीषण अपघात! भरधाव Ferrari चे दोन तुकडे, वृद्ध चालकाचा जागीच मृत्यू

Next


जगभरात दररोज हजारो रस्ते अपघात होत असतात, पण यातील काही अपघात अतिशय भयंकर आणि भीषण असतात. अशाप्रकारचे अपघात पाहून अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारचा एक अपघात सुपरकार 'फेरारी'सोबत झाला आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भीषण अपघातात जगातील सर्वात महागड्या कारपैकी असलेल्या फेरारीचे दोन तुकडे झाले. या अपघातात कारचा चालक दूर फेकला गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपगात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झाला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, लाल रंगाची ही फेरारी 71 वर्षीय रॉबर्ट निकोलेटी चालवत होते. 

एका मागून एक तीन गाड्यांची टक्कर झाल्यानंतर रॉबर्ट यांच्या फेरारीचे दोन तुकडे झाले. या अपघातात इतर गाड्यांच्या चालकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातारदरम्यान रॉबर्ट दारुच्या नेशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. एका टेस्लाच्या कारला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात इतर गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Terrible accident! Speeding Ferrari in two pieces, old driver dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.