मोदींच्या स्वागताची भूतानमध्ये तयारी

By admin | Published: June 11, 2014 01:06 AM2014-06-11T01:06:18+5:302014-06-11T01:06:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परदेश दौ:यासाठी भूतानची निवड केल्याने येथील प्रशासनाद्वारे ही भेट ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे.

Preparations for Modi's reception in Bhutan | मोदींच्या स्वागताची भूतानमध्ये तयारी

मोदींच्या स्वागताची भूतानमध्ये तयारी

Next
>थिंपू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परदेश दौ:यासाठी भूतानची निवड केल्याने येथील प्रशासनाद्वारे ही भेट ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 15 आणि 16 जून रोजी मोदी भूतान दौ:यावर जाणार आहेत. 
नरेंद्र मोदी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौ:यासाठी भूतानची निवड केली आहे. या दौ:याकडे केवळ सार्क देशांचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे, ही बाब आमच्यासाठी मोठय़ा अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत भूतानचे पंतप्रधान त्शेरींग तोब्गे मोदी यांच्या दौ:याचे स्वागत केले. मोदी यांनी भूतानला पसंती देऊन आगामी काळात प्रादेशिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असे तोब्गे यांनी एका स्थानिक वृत्तपत्रला सांगितले. (वृत्तसंस्था)
 
 

Web Title: Preparations for Modi's reception in Bhutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.