३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:42 AM2017-10-02T02:42:51+5:302017-10-02T02:42:58+5:30

फ्रान्समधून ५०० प्रवाशांना घेऊन लॉस एंजिलिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या ए ३८० सुपर जंबो विमानाचे इंजिन ३५,००० फूट उंचीवर तुटल्याने पेच निर्माण झाला

The plane's engine broke at 35 thousand feet high | ३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले

३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले

Next

पॅरिस : फ्रान्समधून ५०० प्रवाशांना घेऊन लॉस एंजिलिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या ए ३८० सुपर जंबो विमानाचे इंजिन ३५,००० फूट उंचीवर तुटल्याने पेच निर्माण झाला, पण पायलटने कॅनडात या विमानाचे सुरक्षित लँडिंग केल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
हे विमान ४९६ प्रवासी आणि चालक दलाचे २४ सदस्य यांना घेऊन निघाले होते. लॉस एंजिलिसकडे जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केले. मात्र, काही वेळानंतर विमान जोरात हलू लागले, असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे विमानाचा मोठा आवाजही येऊ लागला. सोशल मीडियात या विमानाचे फोटो पोस्ट करण्यात आले असून, यात विमानाच्या बाहेरील भागाची झालेली मोडतोड दिसत आहे.
एअर फ्रान्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना घडली, तेव्हा विमान ग्रीनलँडच्या वर होते. आंतरराष्ट्रीय वेळेनुसार, दुपारी ३.४२ वाजता पूर्व कॅनडात सैन्य विमानतळावर सुरक्षितरीत्या हे विमान उतरले. विमानातील सर्व ५२० व्यक्ती सुरक्षित आहेत. घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. बहुधा पंख्याने काम न केल्याने अशी परिस्थिती उद्भवली असावी, असे मत माजी एअरक्राफ्ट मॅकॅनिक डेव्हिड रेहमर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: The plane's engine broke at 35 thousand feet high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.