पाकिस्तानने एफ-१६ चा केला गैरवापर, अमेरिकेने मागितली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:10 AM2019-03-03T03:10:53+5:302019-03-03T03:11:11+5:30

अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ ही लढाऊ विमाने पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरून त्याचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकेने त्याच्याकडून आणखी माहिती मागवली आहे.

Pakistan has misused the F-16 ban, the US asked for information | पाकिस्तानने एफ-१६ चा केला गैरवापर, अमेरिकेने मागितली माहिती

पाकिस्तानने एफ-१६ चा केला गैरवापर, अमेरिकेने मागितली माहिती

Next

वॉशिंग्टन : अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ ही लढाऊ विमाने पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरून त्याचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकेने त्याच्याकडून आणखी माहिती मागवली आहे.
पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवाद प्रशिक्षण तळावर भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमधील भारतीय लष्करी ठिकाणांवर एफ-१६ या विमानांनी हल्ला केला याचा नि:संशय पुरावा गुरुवारी भारतीय हवाई दलाने या विमानाचे काही भाग दाखवून दिला. या भागावर इंग्रजीत एएमआरएएएम अशी नावे आहेत.
आम्ही एफ-१६ ही लढाऊ विमाने अजिबात वापरली नाहीत, असे बुधवारी पाकिस्तानने म्हटले व भारताने आमच्या हवाई दलाच्या दोनपैकी एक विमान पाडले याचाही इन्कार केला होता.
तशा बातम्यांची आम्हाला कल्पना असून आम्ही अधिक माहिती गोळा करीत आहोत, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतासोबत सीमेवर झालेल्या संघर्षात पाकिस्तानने एफ-१६ विमानांच्या वापराच्या अमेरिकेशी केलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या बातम्यांबद्दल विचारले असता त्याने वरील उत्तर दिले. विदेशी लष्करी विक्री कंत्राटांतील अटींचा तपशील जाहीर न करण्याच्या अटींमुळे आम्ही करारातील दुसऱ्या पक्षावर (पाकिस्तान) नेमक्या कोणत्या अटी आहेत याची चर्चा करू शकत नाहीत, असे लेफ्टनंट कर्नल कोन फॉकनर यांनी सांगितले.
जगात अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे संरक्षण साहित्य पुरवणाऱ्या अमेरिकेचे या साहित्याचा वापर दुसरा देश कसा करतो, यावर कठोर लक्ष असते. संरक्षण साहित्याचा गैरवापर झाल्याचे आरोप झाल्यास अमेरिका त्यावर गांभीर्याने विचार करते. (वृत्तसंस्था)
>पुरावे सिद्ध करावे लागतील
फॉकनर म्हणाले की, पाकिस्तानने अमेरिकेसाबेत केलेल्या करारातील अटींचे उल्लंघन झाले आहे का याबाबत कोणताही निर्णय घ्यायच्या आधी किंवा कोणताही निष्कर्ष काढण्याआधी काही गोष्टी सिद्ध करून कराव्या लागतील. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या दस्तावेजानुसार अमेरिकेने एफ-१६ विमानांच्या वापरावर जवळपास डझनभर निर्बंध घातलेले आहेत.

Web Title: Pakistan has misused the F-16 ban, the US asked for information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.