NASA's Drone Race Manually Lost Artificial Intelligence | नासाची ड्रोन रेस, कृत्रिम बुद्धिला मानवाने हरवले

वॉशिंग्टन : नासाने घेतलेल्या एका चाचणीत मानवी पायलटने कृत्रिम बौद्धिकतेवर आधारित (एआय) प्रणालीवर मात करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
या चाचणीत जागतिक स्तरावरील ड्रोन पायलट केन लू यांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली. नासाचे हे विशेष ड्रोन १२९ किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकतात. पण, नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरेटरीचे (जेपीएल) ड्रोन प्रति तास ४८ ते ६४ किमी उडू शकत होते. जेपीएलचे प्रोजेक्ट मॅनेजर रॉब रिड यांनी सांगितले की, आपण पाहू शकता की, एआयव्दारे ड्रोन सहजपणे उडत होते. पण, मानवी पायलटचे ड्रोन आक्रमकपणे उडत होते. त्यामुळे त्यांचा मार्ग धक्क्यांचा होता.
लू यांनी एक उच्च गती प्राप्त केली होती. त्यांचे उड्डाणही प्रभावी होते. तरीही त्यांच्यात थकवा जाणवत नव्हता. याबाबत बोलताना लू म्हणाले की, मी आतापर्यंत केलेल्या उड्डाणात हा अनुभव वेगाच्या दृष्टीने संस्मरणीय होता.