लाइव न्यूज़
 • 12:43 PM

  धुळे : मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपाच्या वालीबेन मंडोरे विजयी.

 • 12:16 PM

  धुळे :समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब यांना समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपात घातला घेराव. मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बालीबेन मंडोरे यांना पाठिंबा दिल्यानं घेराव. पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज

 • 12:00 PM

  सांगोला : जत राज्यमार्गावर खारवटवाडीजवळ टेम्पोची बाईकला धडक. 3 जणांचा जागीच मृत्यू. मृतांची नावं नितीन भुईटे, दामू भुईटे व सुनील इंगवले.

 • 11:59 AM

  वणी (यवतमाळ) : ग्रंथदिंडीने वणीत 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ.

 • 11:46 AM

  अहमदनगर : जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचे निधन. कर्जत पंचायत समितीचे ते सलग 18 वर्षे सभापती होते. जगदंबा साखर कारखाना उभारणीत आबासाहेब निंबाळकर यांच्यासोबतच देशमुख यांचाही सिंहाचा वाटा.

 • 11:45 AM

  2018 मध्ये आणखी 45 कोटी मोबाइल 4G होतील. लवकरच वाय-फायची किरणेच तुमचा मोबाइल चार्ज करतील, वेगळ्या चार्जरची गरज भासणार नाही - मॅथ्यू ओमेन, रिलायन्स जिओ अध्यक्ष

 • 11:45 AM

  नवी मुंबई : पहिली डिजिटल ओपन परिषद, वर्ष 2018 डिजिटल युगात 2017 पेक्षा अधिक खळबळ उडवणारे असेल. 2025पर्यंत भारत 7 लाख कोटींची अर्थव्यवस्था होईल - रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमेन

 • 11:40 AM

  गोवा - महामार्गावरुन पलटलेला अमोनिया वायूचा टँकर हटवला, वायू गळती नियंत्रणात.

 • 11:33 AM

  पद्मावत चित्रपटाला दिलेल्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरोधात दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

 • 10:52 AM

  ठाणे : पद्मावतविरोधातील करणी सेनेचे आंदोलन रद्द, पोलिसांनी नाकारली होती परवानगी.

 • 10:50 AM

  पहिली इंडिया डिजिटल ओपन परिषद नवी मुंबईच्या रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये सुरू, दुपारी आकाश अंबानी करणार मार्गदर्शन , देश परदेशातील सॉफ्टवेअर तज्ज्ञांची उपस्थिती.

 • 10:42 AM

  रायगड : काँग्रेसच्या माजी जि.प.सदस्यावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात इब्राहिम इमाने गंभीर जखमी. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय.

 • 10:24 AM

  पुणे: शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी, पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय.

 • 10:15 AM

  पिंपरी चिंचवड : निगडीत भक्ती शक्ती येथे 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. 26 जानेवारीला येथे तिरंगा फडकवला जाणार आहे.

 • 10:13 AM

  नाशिक : गंगाघाटावरील श्री नारोशंकर मंदिरामागील हळदी, कुंकू तसेच रूखवत विक्री करणाऱ्यांची 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळली.

All post in लाइव न्यूज़