लास वेगसमध्ये मृत्यूचे तांडव , संगीत महोत्सवात माथेफिरूने केला बेछूट गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:56 AM2017-10-03T02:56:04+5:302017-10-03T02:56:58+5:30

एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले

In Las Vegas, the funeral fiasco and fiasco fired at the music festival | लास वेगसमध्ये मृत्यूचे तांडव , संगीत महोत्सवात माथेफिरूने केला बेछूट गोळीबार

लास वेगसमध्ये मृत्यूचे तांडव , संगीत महोत्सवात माथेफिरूने केला बेछूट गोळीबार

Next

लास वेगस : एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले. या हल्ल्याने लास वेगससारखे पर्यटकांचे हब हादरले असून, संपूर्ण अमेरिकेलाही याचा धक्का बसला आहे.
लास वेगस बुलेवर्ड म्हणून ओळखल्या जाणाºया या भागातील हमरस्त्याच्या एका बाजूला एमजीएम रिसॉर्ट््स इंटरनॅशनल या कंपनीची ‘मंडाले बे हॉटेल अँड कसिनो’ची ४५ मजली टोलेजंग इमारत आहे. त्याच्या बरोबर समोर रस्त्याच्या दुसºया बाजूला याच कंपनीचे विविध मनोरंजन कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाणारे खुल्या मैदानातील प्रेक्षागार आहे. हा संगीत महोत्सव याच खुल्या मैदानात सुरु होता. सर्वात भयावह गोष्ट अशी की समोरच्या ‘मंडाले बे हॉटेल’च्या बºयाच वरच्या मजल्यावरून खाली मैदानात सुरू असलेल्या संगीत महोत्सवाच्या श्रोत्यांवर हल्लेखोराने हा गोळीबार केला.
रात्रीच्या काळोखात हॉटेलच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून येणाºया बंदुकीच्या गोळ््यांच्या प्रकाशशलाका प्रत्यक्षदर्र्शींनी पाहिल्या. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष ‘स्वॅट’ पथकाने सरळ मोर्चा हॉटेलकडे वळविला. ३२ व्या मजल्यावर हल्लेखोर सापडला व तेथेच त्यास ठार मारण्यात आले, असे पोलिसांनी सुरुवातीस सांगितले. मात्र नंतर त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त अमेरिकी प्रसिद्धी माध्यमांनी दिले.
स्टिफन पॅडॉक असे या ६४ वर्षांच्या हल्लेखोराचे नाव असून तो लास वेगसपासून ८० मैलावर नेवादा राज्यातील मेस्क्विट येथील रहिवासी होता. वाहतूक नियम मोडल्याच्या किरकोळ गुन्ह्यांखेरीज त्याच्या अन्य कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांच्या दफ्तरी नोंद नाही. हॉटेलमधील हल्लेखोराच्या खोलीत आठ स्वचलित रायफलींसह एकूण १० शस्त्रे मिळाली. त्यांतून शेकडो गोळ््या झाडल्या गेल्या होत्या. हल्लेखोराचा नेमका हेतू लगेच स्पष्ट झाला नसला तरी तो एकटाच होता व त्याचा कोणत्याही संघटित टोळीशी किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध नसावा, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. हॉटेलमधील नोंदीनुसार हल्लेखोरासोबत मेरी लाऊडॅनली नावाची आशियाई वंशाची महिला राहात होती. तिचा शोध सुरू आहे. याखेरीज पोलिसांनी दोन संशयित मोटारी ताब्यात घेतल्या असून त्यापैकी एका मोटारीचा रजिस्ट्रेशन नंबर पर्यटकांसाठी दिला जाणारा आहे. 

Web Title: In Las Vegas, the funeral fiasco and fiasco fired at the music festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.