हार्वेचा तेलगू लोकांना फटका, प्रत्येकी सरासरी ३५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:36 AM2017-09-01T02:36:19+5:302017-09-01T02:36:26+5:30

Harvai's Telugu massacre, each an average loss of 35 lakhs | हार्वेचा तेलगू लोकांना फटका, प्रत्येकी सरासरी ३५ लाखांचे नुकसान

हार्वेचा तेलगू लोकांना फटका, प्रत्येकी सरासरी ३५ लाखांचे नुकसान

Next

हैदराबाद : ह्युस्टनमध्ये हार्वे वादळाचा मोठा आर्थिक फटका तेथे वास्तव्यास असलेल्या तेलगू लोकांना बसला आहे. तेथील प्रत्येक तेलगू घराचे सरासरी ५० हजार डॉलरचे (३५ लाख रुपये) नुकसान झाली आहे. बहुसंख्य तेलगू लोक ग्रेटर ह्युस्टनमध्ये राहत असून, तेथील अनेक घरांची व मालमत्तेची हानी झाली आहे.
अमेरिकेच्या इतिहासात हार्वे वादळ हे भयंकर नैसर्गिक संकट ठरले असून, त्याने टेक्सासमध्ये १६० अब्ज डॉलरची आर्थिक हानी केली आहे. या वादळाने ३८ जणांचा बळी घेतला असून, कित्येक हजार लोकांना बेघर केले आहे.
अशा नैसर्गिक संकटांना विम्याचे संरक्षण मिळत नसल्यामुळे ती कुटुंबे काळजीत आहेत. या नैसर्गिक संकटाचे स्वरूपच फार मोठे होते. त्यामुळे सरकार पीडितांना काही प्रमाणात आर्थिक मदत करील अशी आशा आहे. परंतु त्याची कोणालाही खात्री कोणालाही. सध्या प्रत्येक जण जीविताची काळजी करीत आहे.
कॅटी, शुगरलँड, सायप्रस आणि बेलायरमध्ये १० हजार तेलगू कुटुंबे (किमान ५० हजार लोकसंख्या) वास्तव्यास आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७५ हजार डॉलरचे आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सशिवाय अनेक डॉक्टर्स व व्यावसायिकही तिथे राहतात. त्या सर्वांना पुन्हा उभे राहण्यासाठी कर्जाचाच आधार घ्यावा लागेल, कारण त्यांच्याकडे बँकांत पुरेशी बचत नाही.
गेल्या बुधवारी टेक्सासच्या सीमेनजिकच्या लुईसियाना किनाºयावर हे वादळ धडकले व त्यामुळे विक्रमी असा पाऊस झाला. भयंकर हानी करणारे पूर आला. या वादळाने अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा पाऊस आणला. टेक्सासमध्ये गेल्या शुक्रवारी ५२ इंचाहून अधिक पाऊस पडला. टेक्सास शहरातील २० लोक अजूनही बेपत्ता आहेत. ह्युस्टन शहराचा काही भाग हा काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी राहण्यायोग्य नाही, असे अ‍ॅक्युवेदरचे अध्यक्ष जोएल मायेर्स यांनी सांगितले.

टेक्सासमध्ये सुमारे एक लाख भारतीय राहतात. टेक्सासमधील सरोवराच्या पाण्यात बुडून एक भारतीय विद्यार्थी मरण पावला. पाऊस, वादळ आणि पुरामुळे त्रासलेल्या लोकांच्या मदतीला भारतीय-अमेरिकन समाज धावून आला आहे. भारतीय व्यावसायिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळी अनेकांना निवारा दिला गेला आहे.

Web Title: Harvai's Telugu massacre, each an average loss of 35 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.