भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

By admin | Published: April 19, 2015 03:22 PM2015-04-19T15:22:53+5:302015-04-19T15:55:25+5:30

भूमध्य सागरात लिबियाच्या किनारपट्टीजवळ बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

Fear of 700 deaths due to boat crash in Mediterranean Sea | भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

Next

ऑनलाइन लोकमत 

रोम, दि. 19 - भूमध्य सागरात लिबियाच्या हद्दीत बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेनंतर इटली व अन्य देशांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

भूमध्य सागरात इटलीच्या दक्षिणेकडील लम्पेदुसा बेटाजवळ लिबियाच्या हद्दीत प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बोट शनिवारी रात्री बुडाली. या जहाजातील फक्त 28 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. तर सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या एका अधिका-याने वर्तवली आहे. मृतांचा नेमका स्पष्ट झाल्यास हा दशकातील सर्वात मोठा अपघात ठरु शकतो असे जाणकारांनी सांगितले. या अपघाताविषयी इटलीच्या नौदलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातही भूमध्य सागरात लिबियातून येणारी बोट बुडून 400 जणांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Fear of 700 deaths due to boat crash in Mediterranean Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.