चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

By Admin | Published: May 26, 2015 11:53 PM2015-05-26T23:53:01+5:302015-05-26T23:53:01+5:30

मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत.

38 dead in China's old age fire | चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

googlenewsNext

बीजिंग : मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत.
लुशान येथील खाजगी मालकीच्या कांग्लेयुआन वृद्धाश्रमाला सोमवारी सायंकाळी आग लागली. यासंदर्भात प्रांतिक कार्यालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहाजणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वृद्धाश्रमात ५१ वृद्ध राहत होते. सोमवारी सायंकाळी लागलेली आग विझविण्यास रात्र झाली. रात्री ८.२२ वाजता आग विझल्याचे जाहीर करण्यात आले. मदतकार्य अजूनही सुरूआहे.
या आगीतून वाचलेल्या झाओ युलान (८२) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार झाओ इतर ११ जणांसह एका खोलीत राहत असत, त्याच खोलीतून त्यांना सोडविण्यात आले. फक्त मी व माझी एक रुममेट दोघीच बाहेर पडू शकलो, असे झाओ यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह पूर्ण जळाले असून, नातेवाईकांना ते ओळखणे कठीण जात आहे. २०१० सालच्या अखेरीस या वृद्धाश्रमाला नागरी समितीने मान्यता दिली होती. लुशान प्रांतात असणारा हा वृद्धाश्रम दोन हेक्टरमध्ये पसरला आहे. ६०० चौ. मी. परिसरात एक मजला आहे.
या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांना त्वरित मदत द्यावी व जखमींना उपचार द्यावेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. तसेच आगीचे कारण शोधून काढून जबाबदार लोकांना त्वरित शिक्षा द्यावी, असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे.

४चीनमधील सामाजिक स्तर बिघडत असून, वृद्धांची संख्या वाढत आहे. या वृद्धांचे संरक्षण करणे हे फार मोठे आव्हान बनले आहे. चीनमधील लोकसंख्येपैकी १५.५ टक्के लोक वृद्ध आहेत. २०३० पर्यंत चीनमधील चार व्यक्तींपैकी एकजण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल.
४जानेवारी महिन्यात चीनमधील ग्वांक्सी झुआंग या स्वायत्त प्रांतात लागलेल्या आगीत २१ घरे जळून खाक झाली होती. या आगीमुळे १३० लोक बेघर झाले होते.

 

Web Title: 38 dead in China's old age fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.