औंढा तालुक्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:55 AM2018-01-11T00:55:16+5:302018-01-11T01:06:47+5:30

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.

 Water shortage plan of 2 crore 65 lakh for Aunda taluka | औंढा तालुक्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा

औंढा तालुक्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा

googlenewsNext
ठळक मुद्दे तालुक्यातील १०१ ग्रा.पं.पैकी १२३ गावांत संभाव्य टंचाई

गजानन वाखरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात एकूण १०२ ग्रामपंचायती आहेत. जानेवारी ते मार्चपर्यंतचा टंचाई आराखड्यात १२३ गावांचा समावेश करण्यात आला असून तात्पुरत्या पूरक योजनेत नालेगाव व कुंडकर पिंप्री या दोन गावांचा समावेश केला आहे. यासाठी सात लाख रुपये खर्च नियोजित आहे.
तसेच नळ योजना दुरूस्तीअंतर्गत हिवरखेडा, सावळी बु., जोडपिंप्री, पोटा खु., तपोवन, जवळा बाजार, पुरजळ, शिरला, काठोडा, सारंगवाडी, गवळेवाडी, सेंदुरसना, मार्डी, दरेगाव, संघनाईकतांडा, सोनवाडी, येडुत, फुलदाभा, सुकापूर, ब्राह्मणवाडा यासह पुरजळ येथील २० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजनेच्या दुरूस्तीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची दुरूस्ती केल्यास परिसरातील २० गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
दरम्यान, विंधन विहिरींच्या विशेष दुरूस्तीसाठी आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीने मागणी केली नसल्याचे समजते. परंतु, नवीन विंधन विहिरींसाठी तब्बल ५५ ग्रा.पं.मधून ७५ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत.
यामध्ये उखळी, जलालपूर, उंडेगाव, लांडाळा, दौडगाव, हिवरखेडा, येळी, केळी, पार्डी, सावळी, सावळी बु., सावळी तांडा, जोडपिंप्री, कामठा, अनखळी व वाडी, पेरजाबाद, नारखेडा, पोटा खु, आजसोंडा, असोला ता. औंढा, वडद, काठोडा, काठोडा (त.), चोंढी, शहापूर, नागेशवाडी, शिरडशहापूर, असोला (त.), लाख, लोहरा (बु.), तामटी तांडा, पिंपळदरी- दरेवाडी, येडुत, येहळेगाव, सुरवाडी, फुलदाभा, धारखेडा, पांग्रा (त.), लाख, मेथा महाळसगाव, असोंदा, बोरजा, कुंडकर पिंप्री, तुर्कपिंप्री, अंजनवाडा, अंजनवाडा तांडा, कोंडशी, पाझरतांडा, जांभळी तांडा, दूरचुना, सिद्धेश्वर, वडचुना, नंदगाव, मु. सावंगी, माथा, गांगलवाडी, ब्राह्मणवाडा, गोळेगाव या गावांचा समावेश आहे.
गतवर्षी औंढा नागनाथ तालुक्यात पर्जन्यवृष्टी बºयामुळे झाली होती. त्यामुळे पाणीटंचाई उपाययोजने संदर्भात प्रशासनाला जास्त कसरत करावी लागली नव्हती.
परंतु, गतवर्षीचा तुलनेमध्ये यंदा तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित करावे लागणार असून उपाययोजनेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

२१ गावांनी केली टँकरची मागणी
टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी, चिंचोली, रामेश्वर, केळी तांडा, टाकळगव्हाण, राजांळा, सिरला, सिरला तांडा, टाकळखोपा, लक्ष्मण नाईक तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लोहरा बु. व खुर्द, रेवणसिंग तांडा, पवार तांडा, राजापूर, तळणी, पिंपळदरी, देववाडी, सोनवाडी, येहळेगाव या २१ गावांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. तसेच गतवर्षी या गावांपैकी सिरला, टाकळखोपा व संघनाईकतांडा फक्त या तीनच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर ५० विहिरी व बोअरचे पाणीटंचाईच्या निवारणार्थ अधिग्रहण करण्यात आले होते.
 

 

Web Title:  Water shortage plan of 2 crore 65 lakh for Aunda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.