हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:11 AM2019-09-21T00:11:02+5:302019-09-21T00:11:25+5:30

जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.

 Heavy rains in Hingoli district | हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.
परतीच्या पावसाने तारले
कौठा : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात याहीवर्षी पावसाच्या लहरीपणाने खरीपाच्या हंगामाची सुरवात संकटाने झाली. त्यात पुन्हा पाऊस गायब झाल्याने परिस्थिती दुष्काळसदृश्य झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही मारामार सुरू होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत
आहे.
कौठा परिसरात पाऊस रीमझिमच होता. दमदार पावसाची प्रतिक्षा होती. २० सप्टेंबर रोजी दमदार पाऊस झाल्याने आसना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून ओढे व नाल्यांनाही पहिल्यांदाच पाणी आले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना या पावसाने पुन्हा नवी संजीवनी मिळाली असून पाणी पातळीत ही वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
वसमत परिसरात पाऊस
वसमत : तालुकाभरासह वसमत परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात प्रसन्नतेचे वातावरण झाले असून शुक्रवारी देखील दिवसभराच्या विश्रांतीनंतर मध्यम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस शेतीतील सर्व पिकांसाठी आणि जलसाठ्यासह भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने जमिनीची पूर्ण तहान भागवून शेतातील पिकातून पाणी वाहत असल्याने नदी-नाल्यांना देखील पाणी वाहू लागले आहे.
पिके बहरली
कळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके बहरली असून जलस्त्रोतांना बºयापैकी पाणी आले आहे. १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसात दमदार पाऊस पडल्याने या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पीके बहरली आहेत.
कळमनुरी तालुक्यातील काही भागात मूग तोडणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे नाले, विहीरी, हातपंपांना पाणी आले आहे. एकुणच जलस्तर वाढलेला आहे. तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. ४९३.८ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे इसापूर धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. या पाण्यामुळे शेतकरीही सुखावला आहे
कनेरगावातही पाऊस
कनेरगाव नाका : येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ढगाळ वातावरण व विजेच्या लखलखाटात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पाऊस जास्त जोरात पडण्याची शक्यता दिसत आहे. थंड वारे सुटले आहे. त्यात पावसाची रीपरीप सुरू आहे.
तलाव ओसंडला
औंढा नागनाथ : येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे काठावर असलेल्या औंढा नागनाथ तलाव हा ओसंडून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आता पाणी ओवर फुल होऊन वाहत आहे.दिवसभर उघडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्र भर पडण्याची शक्यता आहे.

Web Title:  Heavy rains in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.