गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:04 AM2018-05-23T01:04:20+5:302018-05-23T01:04:20+5:30

वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे.

 Deadly covered blood | गळा आवळून खून

गळा आवळून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे.
अनैतिक संबंधातून पारवा येथील मुरलीधर कदम यांचा महिलेने सुपारी देवून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सारंगवाडी शिवारातील डोंगरदरीमध्ये दारू पाजून दोरीने गळा आवळून खून करून प्रेत फेकून दिले. दरीत दारू पिऊन खून करण्यात आला. त्यानंतर प्रेत डोंगराच्या भागामध्ये फेकून दिले. घटनास्थळी दारूची बाटलीही सापडली होती.
कुरूंदा पोलिसांनी गळा आवळलेली दोरी जप्त केली असून, खुनाची कबुली अटकेत असलेल्या आरोपींनी दिली. या प्रकरणात आणखी कोणी आहे का? हेही तपासल्या जात आहे. अनैतिक संबंधातून त्रस्त होवून महिलेने सुपारी देवून खून केला असल्याचे तिने आधीच सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे करीत आहेत.

Web Title:  Deadly covered blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.