मारहाणीच्या निषेधार्थ अधिका-यांचे लेखणीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:45 PM2017-12-08T23:45:48+5:302017-12-08T23:45:54+5:30

गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिकाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

Authorship of protesters | मारहाणीच्या निषेधार्थ अधिका-यांचे लेखणीबंद

मारहाणीच्या निषेधार्थ अधिका-यांचे लेखणीबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिकाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
पंचायत समिती सदस्या मुक्ता गोरे यांचे पती संतोष गोरे यांनी गटविकास अधिकारी ए.एल.बोंद्रे यांना त्यांच्या दालनात येऊन मारहाण केली. त्यांना कोणतेच अधिकार नसताना रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्याचा विषय घेऊन त्यांनी हे कृत्य केले. याचा निषेध व्यक्त करून काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एन. घुले, ए.आर.डुब्बल, एन.एस.दाताळ, डॉ.राहुल गिते, डॉ.ए.बी.लोणे, जी.डी. गुठ्ठे, मनोहर खिल्वारी, जे.एम.साहू, सुधीर ठोंबरे, जी.पी.डुकरे, एस.आर. बेले, एस.व्ही. गोरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य शाखेनेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यावर विनोद देसाई, समीर भाटकर, ग.दि.कुलथे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Authorship of protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.