लुटमारीतील आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:04 AM2018-10-07T00:04:37+5:302018-10-07T00:04:50+5:30

सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यातील आणखी एका आरोपीस ३ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींची संख्या आता चार झाली आहे. चार फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

 Another gang of robbers arrested | लुटमारीतील आणखी एकास अटक

लुटमारीतील आणखी एकास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यातील आणखी एका आरोपीस ३ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींची संख्या आता चार झाली आहे. चार फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
हिंगोली-रिसोड रस्त्यावरील उमरा पाटीजवळ जीप थांबवून नितीन तुकाराम राठोड (रा. रोहडा जि. यवतमाळ) वनरक्षकास लुटल्याची घटना घडली होती. राठोड यांच्याकडील तीन लाखांची रोकड व पॉकेटमधील दोन हजार, मोबाईल असा एकूण ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष शंकर चव्हाण रा. वडद ता. महागांव जि. यवतमाळ, माऊली उर्फ मिथून मधूकर चव्हाण रा. पांगरखेडा ता. शिरपूर जि. वाशिम, सुरेश पूंडलीक पवार रा. वडद ता. महागांव जि. यवतमाळ अशी आहेत. आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता वाशिम जिल्ह्यातील पांगरखेडा येथील गोविंद मुसींग पवार हा सोबत असल्याचे आरोपींनी सांगितले. ३ आॅक्टोबर रोजी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी गोविंद पवार यास घरातून अटक करण्यात आली आहे. चार जणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title:  Another gang of robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.