रिसर्चचा दावा च्युइंगम खाल्ल्यावर होतात जबरदस्त फायदे, जे तुम्हालाही माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:23 AM2024-01-24T10:23:14+5:302024-01-24T10:23:45+5:30

Chewing Gum Benefits: योग्य च्युइंगम तुमचे दात आणि पोट चांगलं ठेवतं. तसेच याने तुमचं वजनही कमी होऊ शकतं. 

Health benefits of chewing gum for weight loss and oral health and disadvantages | रिसर्चचा दावा च्युइंगम खाल्ल्यावर होतात जबरदस्त फायदे, जे तुम्हालाही माहीत नसतील!

रिसर्चचा दावा च्युइंगम खाल्ल्यावर होतात जबरदस्त फायदे, जे तुम्हालाही माहीत नसतील!

Chewing Gum Benefits: अनेकदा लहान मुले च्युइंगम खातात. मोठेही खातात. त्याबद्दल त्यांना ओरडाही खावा लागतो. पण याचे काही फायदेही आहेत. योग्य च्युइंग गम तुमचे दात आणि पोट चांगलं ठेवतं. तसेच याने तुमचं वजनही कमी होऊ शकतं. 

च्युइंग गम चघळणं चांगलं

अनेक लोकांना च्युइंगम चगळण्याची सवय असते. लोकांचा अनुभव चांगला करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे च्युइंगम खातात. काही लोक मानतात की, असं केल्याने तोंडाची दुर्गंधी येत नाही आणि चेहऱ्याचा शेपही सुधारतो. पण खरंच च्युइंगम खाल्ल्याने शरीराला फायदा होतो का? चला याबाबत जाणून घेऊ...

वजन होतं कमी

च्युइंगम गोड असूनही त्यात जास्त कॅलरी नसतात. यावर अनेक रिसर्च करण्यात आले. ज्यातील Pubmed वर 2019 मध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, वाल्किंग दरम्यान च्युइंगम चघळल्याने जास्त कॅलरी बर्न होतात.

भूक कमी लागते

वजन कमी करण्यासाठी कमी प्रमाणात च्युइंगम खावं. सतत लागणारी भूक कमी करण्यासाठी याचा फायदा मिळू शकतो. काही रिसर्च सांगतात की, जेवणाच्या मधे च्युइंगम खाल्ल्याने भूक कमी होते.

शुगर फ्री च्युइंगम दातांसाठी फायदेशीर

शुगर फ्री च्युइंगम तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. याने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दात मजबूत होतात. पण यासाठी फक्त असे च्युइंगम खरेदी करा ज्यात xylitol असेल.

स्ट्रेस कमी होतो

जास्त तणाव हळूहळू तुमच्या मेंदुच्या कामाला कमजोर करू लागतो. काही रिसर्चमध्ये आढळून आलं की, च्युइंगम स्ट्रेस कमी करून अॅक्टिवनेस आणि फोकस वाढवतं.

स्मरणशक्ती मजबूत होईल

तरूणपणात जर स्मरणशक्ती कमी झाली असेल तर ही मेंदुची कमजोरी आहे. पुढे जाऊन डिमेंशिया आणि पार्किंसनचा धोकाही वाढू शकतो. असं म्हटलं जातं की, च्युइंगम चघळल्याने स्मरणशक्ती वाढते. यावर अजून जास्त शोधाची गरज आहे.

च्युइंगमचे होणारे नुकसान

आर्टिफिशियल शुगर असलेलं च्युइंगम तुमचे दात कमजोर करू शकतं आणि मेटाबॉलिक हेल्थही बिघडवू शकतं. काही शोधांमध्ये याला डोकेदुखीचं कारणंही मानण्यात आलं आहे. याने जबडाही दुखू शकतो. 

Web Title: Health benefits of chewing gum for weight loss and oral health and disadvantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.