भुसारीटोलाजवळ ट्रक-काळी पिवळीचा भीषण अपघात; तीन ठार, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 10:35 AM2022-11-16T10:35:01+5:302022-11-16T10:35:40+5:30

Gondia Accident : सडक अर्जुनी तालुक्यातील घटना

5 killed in horrific accident of truck and four wheeler collision in sadak arjuni tehsil of gondia dist | भुसारीटोलाजवळ ट्रक-काळी पिवळीचा भीषण अपघात; तीन ठार, सहा गंभीर

भुसारीटोलाजवळ ट्रक-काळी पिवळीचा भीषण अपघात; तीन ठार, सहा गंभीर

googlenewsNext

गोंदियाराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा मार्गावरील भुसारीटोलाजवळ काळी-पिवळी ट्रकची आमोरा-समोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात काळी पिवळीचा पार चेंदामेंदा झाला.

सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक (एमएच ४० वाय ८४८७) व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळीची (एम.एच. ३६, ३१११) धडक झाली. यात काळी पिवळीतील एक जण जागीच ठार झाला तर आठ गंभीर जखमी झाले. त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले करण्यात आले. उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला.

श्याम शंकर बंग (७०) रा. गोरेगाव असे घटनास्थळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अंबिका गोकूलप्रसाद पांडे (६१) रा. चिरचाळी डव्वा, सुरेश शंकर मुनेश्वर (२४) रा. कालीमाटी, ता. आमगाव अशी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. इतर गंभीर असलेल्या सहा जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.  घटनेची माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे, सहायक फौजदार सांदेकर यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गोंदियाला हलविले.

ट्रकचा टायर फुटल्याने बिघडले संतुलन

गोंदियावरून कोहमाराकडे धान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्रक चालकाचे संतुलन बिघडले. ट्रक दुसऱ्या बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या काळी पिवळीवर धडकला. या अपघातात काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला. काळी पिवळीचा छत उडाला.

यांच्यावर सुरू आहे उपचार

या अपघातात गंभीर जखमी असलेले चालक शाकीर अली अब्दुल अली, वनिता भांडारकर, नवेगावबांध येथील टायगर फोर्समध्ये असलेल्या मनीषा चिखलोंडे, दोन अनोळखी पुरुष असून त्यांची ओळख पटली नाही. तर सहावा गंभीर जखमी प्रनोली सतीश राठोड (१५) रा. भुसारीटोला हा गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

केटीएसला आले छावणीचे रूप

भुसारीटोला अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणताच गोंदिया शहरचे ठाणेदार चंद्रप्रकाश सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत व पोलीस अंमलदारांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आरसीबीचे पथक त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

ओळख पटविण्यासाठी शहर पोलिसांचा खटाटोप

अपघातातील गंभीर जखमी व केटीएसमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या दोघांची ओळख पटवून घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी प्रयत्न केले. गंभीर जखमींच्या फोटो सोशल मीडियावर पाठवून ओळख पटवून घेतली. त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यात पोलिसांना यश आले. दोन गंभीर जखमींना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 5 killed in horrific accident of truck and four wheeler collision in sadak arjuni tehsil of gondia dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.