सेवा पुरवण्याच्या नावाखाली पर्यटकांची लुबाडणूक; दलालासह तिघां संशयितांना अटक

By काशिराम म्हांबरे | Published: October 18, 2023 03:07 PM2023-10-18T15:07:31+5:302023-10-18T15:07:42+5:30

लवकरच सुरु होणाऱ्या पर्यटन हंगाम्याची तयारी सुरु असतानाच पर्यटकांची फसवणुक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

Extorting tourists in the name of providing services | सेवा पुरवण्याच्या नावाखाली पर्यटकांची लुबाडणूक; दलालासह तिघां संशयितांना अटक

सेवा पुरवण्याच्या नावाखाली पर्यटकांची लुबाडणूक; दलालासह तिघां संशयितांना अटक

काशीराम म्हांबरे

म्हापसा :  लवकरच सुरु होणाऱ्या पर्यटन हंगाम्याची तयारी सुरु असतानाच पर्यटकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. सेवा पुरवण्याच्या बहाण्याने कर्नाटकातील पर्यटकांना क्लबच्या खोलीत कोंडून त्यांची सुमारे ३० हजार रुपयांना लुबाडणूक करण्याचा प्रकार कळंगुट परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दलालासह तिघां संशयितांना अटक केली आहे.

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधी  एस सतीशकुमार  ( कोलार- कर्नाटक ) यांनी तक्रार दाखल केली होती.  एका दलालाने तक्रारदार तसेच त्याच्या साथीदारांना सेवा पुरवण्याच्या नावाखाली सोबत नेले.

एका क्लबातील खोलीत नेल्यावर  त्यांना मारहाण करुन जबरदस्तीनेमोबाईलवरून रक्कम त्यांच्या नावावर हस्तांतरण करण्यास सांगितले. केलेल्या तक्रारीच्या आधारावर कळंगुट पोलिसांनी नंतर शाहरुख देवगिरी ( काणका-पर्रा ), सिरील डायस ( देवसू पेडणे)  तसेच अविनाथ पटेल ( खोब्रावाडा कळंगुट) यांना अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसंशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून उपनिरीक्षक राजाराम बागकर तपास करीत आहेत.

Web Title: Extorting tourists in the name of providing services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.