आव्हाने पेलून अखंडित विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:09 AM2018-12-01T01:09:48+5:302018-12-01T01:11:36+5:30

विजेची निर्मिती, वहन व वितरण यांच्यामध्ये अनेक आव्हाने पेलत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ राज्यातील वीज ग्राहकांना काही अपवाद वगळता अखंडीत वीज पुरवठा करीत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा देत आहे,......

Uninterrupted power supply due to challenges | आव्हाने पेलून अखंडित विद्युत पुरवठा

आव्हाने पेलून अखंडित विद्युत पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देविश्वास पाठक यांची माहिती : चार वर्षात केलेल्या कामांचा दिला लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विजेची निर्मिती, वहन व वितरण यांच्यामध्ये अनेक आव्हाने पेलत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ राज्यातील वीज ग्राहकांना काही अपवाद वगळता अखंडीत वीज पुरवठा करीत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा देत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारीचे कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने मागील चार वर्षात केलेल्या कामांची माहिती पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल घोगरे, जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना पाठक यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी जी आश्वासने वीज ग्राहकांना देण्यात आली होती, ती आश्वासने पूर्णत्वाकडे नेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. ज्या गावांमध्ये व ज्या घरांमध्ये वीज पोहोचली नव्हती अशा गाव व घरांना प्राधान्य देत त्या गावांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्था व समाजाचा कणा आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अत्यल्प दरात वीज पुरवठा केला जात असल्याचे पाठक यांनी सांगितले.
गावातील विजेची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वीज सेवक नेमला जात आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीतील बिघाड त्वरीत दुरूस्त होऊन अखंडीत वीज पुरवठा होण्यास मदत होत आहे.
नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत ४ लाख ३४ हजार ३०४ कृषीपंपांना वीज जोडण्या दिल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४ हजार १८७ कोटी रूपये खर्च आला आहे. मार्च २०१९ पर्यंत अडीच लाख कृषीपंपांना उच्च दाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमधील कृषीपंप वीज जोडणीचा अनुशेष पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आॅनलाईन सेवेवर भर
वीज ग्राहकांना विविध सेवा आॅनलाईन, विशेषत: मोबाईलवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून महावितरणने मोबाईल अ‍ॅपची सुविधा दिली आहे. यात विविध पर्यायांद्वारे वीज बिलाचे रिडींग न घेतल्यास ग्राहकाला स्वत: फोटोद्वारे रिडींगचे फोटो पाठविता येतात. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज बिलांचा भरणा, वीज सेवांबाबत तक्रारी आदी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मोबाईल अ‍ॅप ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. गुगल प्ले स्टोअर्समध्ये पहिल्या १५ फ्रि बिजनेस अ‍ॅपमध्ये महावितरण मोबाईल अ‍ॅपचा समावेश आहे. वीज बिलाची दुरूस्ती प्रक्रिया ४ जूनपासून आॅनलाईन केली आहे. यामध्ये ग्राहकांना राज्यातील कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार नोंदविता येते. आॅनलाईनमुळे ग्राहकांचे श्रम, पैसा, वेळ वाचण्यास मदत होत आहे.

Web Title: Uninterrupted power supply due to challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.