मामा-भाच्यासह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:58 AM2018-06-08T00:58:10+5:302018-06-08T00:58:10+5:30

मुलचेरा येथील वन विकास महामंडळाच्या वसाहतीपासून जवळच कोपरअल्ली मार्गावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मामा-भाचा ठार झाले. तर इतर चार जण जखमी झाले. तसेच अहेरी-देवलमरी मार्गावर मोदुमतुरा येथे ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

Three dead with maternal uncle | मामा-भाच्यासह तिघांचा मृत्यू

मामा-भाच्यासह तिघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देअनियंत्रित दुचाकींमुळे घात : मुलचेरा व अहेरी तालुक्यातील मोदुमतुरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा/अहेरी : मुलचेरा येथील वन विकास महामंडळाच्या वसाहतीपासून जवळच कोपरअल्ली मार्गावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मामा-भाचा ठार झाले. तर इतर चार जण जखमी झाले. तसेच अहेरी-देवलमरी मार्गावर मोदुमतुरा येथे ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
मुलचेरा येथे झालेल्या अपघातात हरीशकुमार डे (१०) रा. चंद्रपूर, विष्णू घरामी (२४) रा. देशबंधूग्राम हे दोघे ठार झाले. तर अजय बारीकराव कुमरे (१९), दशरथ अरूण कन्नाके (१९) रा. मुलचेरा, चंपा सुखदेव रॉय (४०), शिल्पा गोपाल सरकार (१७) रा. विश्वनाथनगर हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. मुलचेरा येथून विश्वनाथनगर येथे शिल्पा गोपाल सरकार हिला सोडण्यासाठी अजय कुमरे व दशरथ कन्नाके हे दुचाकीने कोपरअल्लीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुलचेरा टोलाजवळ विरूध्द दिशेने विष्णू घरामी, हरिशकुमार डे व चंपा सुखदेव रॉय हे दुचाकीने येत होते. दोन भरधाव दुचाकींची जबर धडक झाली. या धडकेत भाचा हरीशकुमर डे याचा जागीच मृत्यू झाला तर मामा विष्णू घरामी यांना मुलचेरा ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अहेरी-देवलमरी मार्गावर झालेल्या अपघातात देवलमरी येथील विजय शंकर गवडेवार हा युवक ठार झाला आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. जेसीबी मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रकने विजयच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये विजयचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे.

Web Title: Three dead with maternal uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात