पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार

By दिलीप दहेलकर | Published: May 3, 2024 01:54 AM2024-05-03T01:54:44+5:302024-05-03T01:55:11+5:30

आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pick-up collides with two-wheeler one dead | पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार

पिकअपची दुचाकीला धडक, नवरदेवाची आई ठार

गडचिराेली : नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली पिकअपला बांधून नेत असताना सदर पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ एप्रिल राेजी गुरूवारला सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चाैकात घडली. विशेष आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेखा नामदेव राऊत (४४) रा. सावली जि. चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली. हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिराेली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दाेनही जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यु झाला. तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सावली येथील नामदेव राऊत यांच्या दाेन मुलाचे लग्न हाेते. अमित राऊत नामक माेठया मुलाचे लग्न १ मे बुधवारला राेजी सावली येथे पार पडले. तर २ मे राेजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे हाेते. सदर लग्नकार्य आटाेपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवर गडचिराेलीमार्गे सावलीकडे जात हाेती. दरम्यान कारगिल चाैकात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

अपघाताची पुनरावृत्ती
विशेष म्हणजे मागील वर्षी १ मे २०२३ राेजी याच कारगिल चौकात एका युवकाला ट्रकने जागीच चिरडले होते. एक वर्षानंतर परत याच ठिकाणी याच तारखेला अपघात झाला. शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचा दुर्लक्षितपणा जीवघेणा ठरत ठरत असल्याचे नागरिकांमधून बाेलले जात आहे.
 

Web Title: Pick-up collides with two-wheeler one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.