राष्ट्रीय मार्गाची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:45 AM2018-08-02T00:45:09+5:302018-08-02T00:47:48+5:30

तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

National road condition is tough | राष्ट्रीय मार्गाची अवस्था बिकट

राष्ट्रीय मार्गाची अवस्था बिकट

Next
ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : छत्तीसगडमधून येणाऱ्या जड वाहनांमुळे रस्ता खड्डेमय

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
धानोरावरून छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. शिवाय छत्तीसगड राज्यातूनही गडचिरोलीकडे नियमित जड वाहने येत असतात. दिवसभर येथून वाहनांचे आवागमन असते. शिवाय प्रवाशी मोठी वाहने व प्रवाशी लहान वाहने यांचाही वाहतुकीमध्ये समावेश होतो. शिवाय दुचाकी, चारचाकी वाहने येथून ये-जा करीत असतात. वाहनांच्या वर्दळीमध्ये मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. राजोली ते लेखापर्यंत रस्त्याची अतिशय दैैनावस्था झाली आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने किरकोळ अपघातात वाढ झाली आहे.
त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. दरवर्षी काही भागापुरती रस्त्याची डागडुजी केली जाते. परंतु अल्पावधीतच रस्त्याची अवस्था जैैसे थे होते. केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: National road condition is tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.