FIFA Football World cup Semi final : फ्रान्सचा अडथळा बेल्जियम पार करणार, की...? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:49 PM2018-07-09T20:49:32+5:302018-07-09T20:50:02+5:30

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.  

FIFA Football World cup Semi final: Can belgium cross French barrier? | FIFA Football World cup Semi final : फ्रान्सचा अडथळा बेल्जियम पार करणार, की...? 

FIFA Football World cup Semi final : फ्रान्सचा अडथळा बेल्जियम पार करणार, की...? 

Next

सेंट पीटर्सबर्ग  -  फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.  
बेल्जियम संघात एकाहून अधिक ‘मॅचविनर’ आहेत. रोमेलू लुकॅकूने चार गोल करताना संघाच्या आक्रमणाची धुरा समर्थपणे पेलली आहे. त्याला इडेन हझार्डची साथ लाभली आहे. मात्र नॅसेर चॅडली, केव्हिन डी ब्रुयने , जॅन व्हर्टोन्घेन, मॅरॉएन फेलॅइनि, ड्रीएस र्मेर्टेन्स, अदनान जॅन्युझॅज आणि मिकी बॅट्शुयावी प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला आहे. फ्रान्सने ९ गोल करताना ४ खाल्लेत. मात्र बेल्जियमने १४ करताना अवघे पाच खाल्ले आहेत. यावरून बेल्जियमचा बचावही तितकाच भक्कम असल्याची प्रचिती येते. फ्रान्सची भिस्त अँटोइने ग्रीझमनसह कायलिन मॅब्प्पे, ऑलिव्हर जिरूड, पॉल पोग्बा यांच्यावर आहे.   



फ्रान्सने सर्वाधिक 74 सामने हे बेल्जियमविरूद्धच खेळले आहेत. मात्र, केवळ दोनवेळाच ते विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले आहेत. 1986च्या विश्वचषक स्पर्धेच्या तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात उभय संघ खेळले होते.  त्यानंतर त्यांच्यात केवळ 8 मैत्रीपूर्ण सामने झाले आहेत. 

Web Title: FIFA Football World cup Semi final: Can belgium cross French barrier?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.