विजयी लय राखण्यास इंग्लंड उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:00 AM2017-10-17T02:00:19+5:302017-10-17T02:00:51+5:30

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा इंग्लंडचा संघ शानदार फॉर्म कायम राखत उद्या जापानसोबत भिडेल. फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जापानला पराभूत करत पहिला अडथळा पार करण्यासाठी मैदानात उतरेल.

 England look forward to keeping the winning streak | विजयी लय राखण्यास इंग्लंड उत्सुक

विजयी लय राखण्यास इंग्लंड उत्सुक

Next

कोलकाता : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा इंग्लंडचा संघ शानदार फॉर्म कायम राखत उद्या जापानसोबत भिडेल. फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जापानला पराभूत करत पहिला अडथळा पार करण्यासाठी मैदानात उतरेल.
तीन सामन्यात ११ गोल करणारा इंग्लंडचा संघ फ्रान्सनंतर दुसºया स्थानावर आहे. त्यांचे लक्ष्य तिस-यांदा क्वार्टर फायनलमध्ये जागा बनवण्यावर असेल. मात्र २०११ नंतर इंग्लंडचा संघ अंतिम आठमध्ये पोहचलेला नाही.
इंग्लंडने कोरियामध्ये झालेल्या २० वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आहे. आणि पोलंडमध्ये युरो २१ वर्षाआतील अंतिम चारमध्ये जागा बनवली. या संघाने युएफा युरोपीय १७ वर्षाआतील चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्पेनकडून पराभव पत्करला.
चिलीत २०१५ मध्ये झालेल्या १७ वर्षाआतील विश्वचषकात इंग्लंड एकही सामना जिंकू शकला नव्हता. आणि तीन सामन्यात फक्त एक गोल केला होता. या वेळी स्टिव्ह कुपर यांच्या मार्गदर्शनात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे.
पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून बाद फेरीत जागा बनवणा-या इंग्लंडने इराकला अखेरच्या सामन्यात ४-० ने पराभूत केले. दुसरीकडे जापानने पहिल्या सामन्यात होंडुरासला ६-१ असे पराभूत केले.


फुटबॉलवेड्या स्पेनची लढत फ्रान्ससोबत

गुवाहाटी : साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून आत्मविश्वास वाढलेल्या माजी विजेत्या फ्रान्सचा सामना फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आघाडीचा संघ स्पेनसोबत होणार आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल.
फ्रान्सने या स्पर्धेत युरोपातून प्ले आॅफ सामना जिंकून पाचवा संघ म्हणून जागा निर्माण केली. या स्पर्धेचा २००१ चा विजेता संघ असलेल्या फ्रान्सचे या स्पर्धेतील प्रदर्शन शानदार राहिले आहे. फ्रान्सने पहिल्या सामन्यात न्यू कॅलेडोनियाला ७-१ ने पराभूत केले. त्यानंतर जापानला २-१ ने पराभूत केले. अखेरच्या सामन्यात होंडुरासला ५-१ ने मात दिली. फ्रान्सच्या संघाने स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्वाधिक १४ गोल केले आहे.
फ्रान्सला या स्पर्धेत सर्वात कडवा प्रतिस्पर्धी म्हणून स्पेनचा सामना करावा लागणार आहे. स्पेन युरोपियन चॅम्पियन आहे.


इराकची मंगळवारी मोठी परीक्षा

मडगाव, गोवा : गतवेळच्या उपविजेत्या माली संघासोबत इराकची मंगळवारी मोठी परीक्षा होणार आहे. इराक संघाचा सामना मंगळवारी रात्री आठ वाजता आफ्रिकन देश मालीच्या विरोधात होईल. या सामन्यात मालीला विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
दोन वेळच्या विजेत्या मालीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्यांनी ग्रुप बी मध्ये दुसºया स्थानावर राहत बाद फेरी गाठली. त्यांनी ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पॅराग्वेकडून २-३ ने पराभव पत्करला. मात्र त्यानंतर शानदार पुनरागमन करत तुर्कीला ३-० आणि न्यूझीलंडला ३-१ असे पराभूत केले. मालीच्या आक्रमकांसमोर इराकच्या बचावफळीच्या कौशल्याची परीक्षा असेल.
इराकचे खेळाडू मालीच्या फॉरवर्ड खेळाडूंना कसे रोखतात, याकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असेल. या सामन्यात इराकचा संघ कर्णधार मोहम्मद दाऊदशिवाय उतरणार आहे. मालीचा स्ट्रायकर लसाना एनडियाये आणि जिमूसा ट्राओरेने चांगला खेळ केला आहे.

मेक्सिकोला इराणचे आव्हान

मडगाव : शानदार खेळानंतर आत्मविश्वास वाढलेला दिग्गज संघ इराण मंगळवारी फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात इराण विरोधात आपली लय कायम राखण्याच्या उद्देशानेच उतरेल. इराणने तिन्ही सामने जिंकत ग्रुप सी मध्ये अव्वल स्थान पटकावले. चौथ्यांदा या स्पर्धेत खेळत असलेला इराण पहिल्यांदाच अंतिम १६ मध्ये पोहचला आहे.

 

Web Title:  England look forward to keeping the winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.