वातानुकुलित ९ डबे घेऊन धावले इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:47 PM2019-03-14T22:47:22+5:302019-03-14T22:47:47+5:30

धुळे ते चाळीसगाव : इलेक्ट्रिक इंजिनची धुळ्यात यशस्वी चाचणी

Running engine carrying 9 coaches | वातानुकुलित ९ डबे घेऊन धावले इंजिन

वातानुकुलित ९ डबे घेऊन धावले इंजिन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वाफेवर नंतर डिझेलवर धावणारी धुळे-चाळीसगाव रेल्वे आता लवकरच इलेक्ट्रिक इंजिन घेऊन ताशी ९० किमी इतक्या वेगाने धावणार आहे़ तत्पुर्वी धुळे ते चाळीसगावपर्यंत वातानुकुलित ९ डबे घेऊन इलेक्ट्रिक इंजिन धावल्याने चाचणी यशस्वी झाल्याचा प्रत्यय गुरुवारी आला़ 
धुळे ते चाळीसगाव पर्यंतचे ५६ किमी इतके अंतर पुर्वी वाफेवर चालणारे इंजिन पार करत होते़ त्यानंतर वाफेच्या इंजिनची जागा डिझेलवर चालणाºया इंजिनने घेतली़ बराच काळ या डिझेलच्या इंजिनने आपली सेवा दिली होती़ यानंतरच्या काळात विजेवर चालणाºया इंजिनसह पुणे आणि मुंबई इथपर्यंत रेल्वे पोहचली पाहीजे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती़ 
त्याअनुषंगाने गेल्या आठवड्यापासून विजेच्या तारा टाकण्याचे काम सुरु झाले होते़ हे काम पूर्ण होत असल्याने चाळीसगावहून धुळ्यापर्यंत काही अडचणी येतात का, याची चाचपणी करण्यासाठी केवळ इंजिन चाळीसगावहून धुळ्यापर्यंत विना अडथळा पोहचले होते़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर वातानुकुलित डब्यासह इंजिन धावू शकते का? याची चाचपणी घेण्यात आली़ त्यात ९ डबे लावण्यात आले आणि ९० किमी ताशी वेगाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रेल्वे धावली़ 
इलेक्ट्रिक इंजिन आणि ९ वातानुकुलित डब्यांमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि काही कर्मचारी विराजमान होते़ धुळ्याहून चाळीसगावपर्यंत रेल्वे धावत असताना कोणत्या प्रकारचे अडथळे येतात का, काही समस्या उद्भवल्यास काय पर्याय करता येईल, रेल्वेचा वेग ताशी ९० किमी इतका आहे का याची सर्वंकष चाचणी यावेळी घेण्यात आली़ त्याचवेळेस नियमित धावणारी धुळे - चाळीसगाव रेल्वेला मात्र अडथळा होऊ दिला नाही़  

१५० कर्मचाºयांची होते विशेष पथक
धुळ्याहून चाळीसगाव आणि तेथून मुंबईपर्यंत इलेक्ट्रिक इंजिन आणि वातानुकुलित डब्यांची चाचपणी करण्यासाठी रेल्वे विभागाकडून ए़ के़ जैन (मुंबई), नील बाबरे (मुंबई), अनुप रेलने (रेल्वे अभियंता) आणि धुळ्याचे स्टेशन प्रबंधक सुनील महाजन यांच्यासह १५० रेल्वे विभागाचे पथक तपासणीकामी सज्ज होते़ पथकातील अधिकाºयांनी धुळ्यात येताच प्रबंधक महाजन यांच्याकडून माहिती संकलित केली़  

Web Title: Running engine carrying 9 coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे