पद्मावत चित्रपटास विरोध आमोदेजवळ बस जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:19 PM2018-01-24T17:19:21+5:302018-01-24T17:21:06+5:30

शिरपूर : बस चालक जखमी, प्रवासी सुखरुप; उद्या शिंदखेडा बंद

The protest against the Padmavat film was burnt down | पद्मावत चित्रपटास विरोध आमोदेजवळ बस जाळली

पद्मावत चित्रपटास विरोध आमोदेजवळ बस जाळली

Next
ठळक मुद्दे चिमठाणे व धुळ्यात रास्तारोको, उद्या शिंदखेडा बंदचिमठाणे आणि धुळ्यातील हॉटेल रेसीडेन्सीजवळ महामार्गावर राजपूत समाज, विविध हिंदू संघटना आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान, २५ जानेवारी रोजी राजपूत समाजाने शिंदखेडा बंदचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (जि. धुळे) : ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या कारणावरून आमोदे गावाजवळ काहींनी बस जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली़ बसचालक जखमी झाला. सुदैवाने बसमधील प्रवाशी काही क्षणातच बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ या घटनेत बसचे लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले़
शिरपुरात मंगळवारी  रात्री १०़२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ शिरपूर डेपोची गाडी क्रमांक एम़एच़२०-बीएल-१३४९ धुळ्याकडे जाण्यासाठी निघाली असतांना मार्गावरील आमोदे गावाजवळ काहींनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्यात तर काहींनी रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गाडीतील प्रवाशी लागलीच खाली उतरल्यामुळे मोठी दुघर्टना टळली़ मात्र गाडीचालक नंदलाल परबत कंखरे हे जखमी झालेत़
 चालक कंखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम, योगेश, राहूल, प्रशांत सह इतर १६ जणांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १२० ब, १४३, १४७, ३४१, ३३७, ३०७, २७ प्रमाणे बस जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़   बसचे एक लाखापर्यंत नुकसान झाल्याचे आगारप्रमुख स्वाती पाटील यांनी सांगितले़

Web Title: The protest against the Padmavat film was burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.