धुळ्यात रुग्णांची होणारी हेळसांड वेळीच रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:48 PM2018-09-22T22:48:36+5:302018-09-22T22:50:02+5:30

डॉ़ सुभाष भामरे : अटल महाआरोग्य शिबिरानंतर उमटले पडसाद, तातडीची बैठक

Prevent bloating of patients in Dhule | धुळ्यात रुग्णांची होणारी हेळसांड वेळीच रोखा

धुळ्यात रुग्णांची होणारी हेळसांड वेळीच रोखा

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांनी घेतली अचानक बैठकडॉक्टरांना सल्ला देत केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांच्या पुनर्तपासणीकडे डॉक्टरांनी वेळीच लक्ष द्यावे़ तालुका आणि ग्रामीण स्तरावरुन रुग्णांची माहिती घेत त्यांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूचना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी बैठकीत दिल्या़ दरम्यान, शिबिराच्या माध्यमातून दाखल रुग्णांची डॉ़ भामरे यांनी प्रत्यक्ष भेटून चौकशी केली़ 
अटल महाआरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे सांगत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी शिवसेनेने आंदोलन करत आरोग्य प्रशासनाला जाब विचारला होता़ त्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी शनिवारी अचानक बैठक बोलाविली होती़ त्यात त्यांनी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करत सूचनाही दिल्या़ यावेळी आमदार स्मिता वाघ, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ़ जितेंद्र ठाकूर यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ़ अरुण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ राजकुमार सुर्यवंशी तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते़ 
डॉ़ भामरे यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात भेट देत विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली़ त्याच्या सुरुवातीला अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांची आणि त्यांच्या पुनर्तपासणीचे पुढे काय झाले, काम कुठपर्यंत आले असा जाब विचारत आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कौतूक केले़ याठिकाणी जो काही गोंधळ शुक्रवारी उडाला होता, तसा प्रकारचा गोंधळ पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असेही त्यांनी सांगितले़ 
रुग्णालयात येणाºया प्रत्येक रुग्णाला सेवा मिळावी़ त्यात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ देवू नका़ समन्वय समितीचे गठन करुन रुग्णांच्या सोईसाठी ठिकठिकाणी बूथ कार्यान्वित करण्यात यावेत़ आवश्यकता भासल्यास अभ्यागत मंडळ समितीच्या सदस्यांचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले़ 
तसेच रुग्णांचे नियोजन तालुका निहाय करण्यात यावे़ त्याची जबाबदारी तालुका आणि ग्रामीण पातळीवरील आरोग्य विभागातील कर्मचाºयांवर सोपविण्यात यावी़ ही जबाबदारी संबंधितांनी पार न पाडल्यास त्यांची नावे आम्हाला कळवा, असेही त्यांनी सूचित केले़ 
दरम्यान, अभ्यागत समितीची बैठक होण्यापुर्वी चार दिवस अगोदर अजेंडा पाठविण्यात येईल़ त्यावेळेस सर्वच विभागांची पाहणी, तपासणी केली जाईल़ सविस्तर आढावा घेऊ असेही भामरे यांनी सुचित केले़

Web Title: Prevent bloating of patients in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.