पृथ्वीराज कपूर यांच्यासह धुळ्यात आलेल्या ‘त्या’ मुलाने वेधले होते लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:44 AM2017-12-05T11:44:44+5:302017-12-05T11:49:48+5:30

शशी कपूर यांनी १९५४ मध्ये दिली होती धुळ्यात भेट

The person who came in Dhule with Prithviraj Kapoor was very special | पृथ्वीराज कपूर यांच्यासह धुळ्यात आलेल्या ‘त्या’ मुलाने वेधले होते लक्ष

पृथ्वीराज कपूर यांच्यासह धुळ्यात आलेल्या ‘त्या’ मुलाने वेधले होते लक्ष

Next
ठळक मुद्देधुळ्यातील विजयानंद थिएटरमध्ये झाला होता नाटकाचा प्रयोग‘पगला घोडा’ या नाटकाच्या प्रयोगासाठी शशी कपूर धुळ्यातधुळ्यातील कोतवाल यांच्याकडे केला होता मुक्काम

आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.५ : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते शशी कपूर यांनी े वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासह २५ डिसेंबर १९५४ रोजी धुळ्याला भेट दिली होती. त्यांच्या जुन्या आठवणी आजही ताज्या असल्याचे साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले़ ते ७९ वर्षांचे होते़ मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला़ शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती़
सिनेसृष्टीतील सर्वात जुने कलावंत बॉलिवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर यांची निर्मिती असलेले ‘पगला घोडा’ हे हिंदी नाटक त्यांनी बसविले होते़ राज्यभर त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी आयोजित केले होते़ ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी हे प्रयोग नेले होते त्या-त्या ठिकाणी त्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता़ यात विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव शशी कपूर त्यांच्यासोबत होते़ धुळ्यात ते आले होते़ आताचे स्वस्तिक चित्रमंदिर पूर्वी विजयानंद थिएटर नावाने प्रसिद्ध होते. तेथे ‘पगला घोडा’ या त्यांच्या नाटकाचा प्रयोग झाला. शशी कपूर सोबत असल्याने त्या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधले होते़ पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा म्हटल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे उपस्थितांच्या नजरा वेधल्या जात होत्या़ तसेच पृथ्वीराज कपूर आपल्या मुलासोबत धुळ्याचे कोतवाल यांच्याकडे थांबले होते़ अशा जुन्या आठवणी पुणेस्थित शैलजा मोगलाईकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़

 

Web Title: The person who came in Dhule with Prithviraj Kapoor was very special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.