धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पकडले मोबाईल चोरट्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:00 PM2019-02-14T13:00:18+5:302019-02-14T13:00:41+5:30

दोघांकडून २६ मोबाईल जप्त : २ लाख ११ हजाराचा मुद्देमाल

Mohali police arrested in Dhundia, mobile thieves arrested | धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पकडले मोबाईल चोरट्यांना

धुळ्यात मोहाडी पोलिसांनी पकडले मोबाईल चोरट्यांना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोहाडी पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन राबवित असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आदर्श येथे जेवण करण्यासाठी दोन मोबाईल चोर आले असल्याची माहिती मिळताच छापा टाकण्यात आला़ यात खुशाल उर्फ मन्या अशोक मोकळ (रा़ दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, म्हाडा वसाहत, धुळे) आणि हर्षल राजेंद्र मेंढे (रा़ सहजिवन नगर, शासकीय दूध डेअरीजवळ, धुळे) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली़ त्यांच्या चौकशीतून २५ वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुलीही त्यांनी दिली़ त्यांच्याकडून २ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़ 

Web Title: Mohali police arrested in Dhundia, mobile thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.