धुळ्यात आमदारांना पाठिंबा जाहीर करताच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:38 AM2018-03-12T11:38:07+5:302018-03-12T11:38:07+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संतप्त : आमदारांच्या वादग्रस्त कामांना विरोध करणार असल्याचा सोशल मिडीयावर पवित्रा

MNS internal dispute gets announcing support to Dhondh | धुळ्यात आमदारांना पाठिंबा जाहीर करताच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

धुळ्यात आमदारांना पाठिंबा जाहीर करताच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

googlenewsNext
ठळक मुद्देमनसेने आमदाराच्या आंदोलनाला पाठींबा दिलानिर्णय घेतांना विश्वासात घेतले नाहीपक्षाच्या भूमिकेकडे लक्ष


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केलेल्या माझं शहर बदलतयं या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेतील अंतर्गत धुसफूस सोशल मिडीयावरच चव्हाट्यावर आली आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आमदारांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे़
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी आमदार अनिल गोटे यांच्या ‘माझं शहर बदलतयं’ या आंदोलनाला पाठिंबा दिला़ मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहराध्यक्ष डॉ़ मनिष जाखेटे यांनी व्यासपीठावर जाऊन विकास कामांसाठी आमदारांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले़
मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अन्य पदाधिकाºयांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे़ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्र व राज्य सरकारवर तोफ डागत असतांना धुळयात मनसे भाजपच्या आमदारास पाठिंबा कसा दिला जातो? आमदार अनिल गोटे दर निवडणूकीत वादग्रस्त मुद्दे काढत ‘पब्लिसिटी स्टंट’ करीत असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आमदारांच्या कामांना विरोध करीत आहे़ पण असे असतांनाच मनसेच्या पदाधिकाºयांनी एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासात न घेता अचानक आमदारांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा कितपत योग्य आहे? असा प्रश्न मनविसेने उपस्थित केला आहे़  जर पक्षाचे धोरणात्मक निर्णयही विश्वासात न घेता होणार असतील तर मनसैनिकांनी पक्षात का राहावे? असा प्रश्नच काही पदाधिकाºयांनी सोशल मिडीयावर उपस्थित केला आहे़ तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आमदारांना पाठिंबा नाही, असेही स्पष्ट   केले आहे. तसेच  आज आमदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, उद्या पक्षही त्यांच्या पक्षात विलीन कराल का? असा प्रश्न मनविसेने स्वपक्षाच्या पदाधिकाºयांना सोशल मिडीयावर विचारला आहे़
आता या बाबतीत पक्षाकडून काय भुमिका घेतली जाते हे महत्वाचे ठरेल़
मनसेचे अन्य पदाधिकाºयांमध्येही नाराजी
कार्यक्रमांना न बोलाविणे, परस्पर निर्णय घेणे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न न करणे अशा अनेक मुद्यांवरून मनसेत अंतर्गत नाराजीनाट्य सुरू आहे. मात्र आता थेट आमदारांच्या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिल्याचे जाहीर झाल्यानंतर यावर काही पदाधिकाºयांनी सोशल मिडियावरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत या निर्णयाला एकप्रकारे उघडपणे विरोध केला आहे. सोशल मिडियावरुन दिवसभर यावर मेसेज फिरत होते.


 

Web Title: MNS internal dispute gets announcing support to Dhondh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.