पारा ४१ अंशावर; उष्णतेच्या लाटेची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:10 AM2019-05-18T11:10:53+5:302019-05-18T11:11:27+5:30

उन्हापासून बचावाची काळजी घ्या : प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Mercury at 41 degrees; The possibility of heat waves | पारा ४१ अंशावर; उष्णतेच्या लाटेची शक्यता 

dhule

Next

धुळे :  रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून ‘एप्रिल हॉट’मुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात  उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला. अद्याप धुळेकरांना चटके बसत आहे़ 
सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत़ नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने १२ ते ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी होत असून शहरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येते़ सकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़ 
आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ 
शहरात वाढलेल्या तापमानाचा तडाखा बसत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़   तीव्र उन्हामुळे अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे़ त्याचप्रमाणे धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे खोकल्याची साथ सुरू असून काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे़
सायंकाळी वाढली गर्दी
सकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़ 

हे करू नये.
भर उन्हात उघड्यावर जावू नये़
एसीतून कडक उन्हात जावु नये़
गडद रंगाचे, जाड कपडे टाळावे़
उन्हाच्यावेळेत स्वयंपाक टाळावे़
चहा, मद्य, शितपेय टाळावे़ 
शिळे व उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे़

हे करावे़
सुरक्षित गॉगल वापरा़
गार पाण्याने डोळे धुवा
आहारात जीवनसत्व असावित़
डोळ्यांवर काकडीच्या चकल्या ठेवाव्यात
रबरी सोलच्या चपला, बूट वापरा
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़ 

Web Title: Mercury at 41 degrees; The possibility of heat waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे