धुळ्यात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:54 AM2019-05-07T11:54:48+5:302019-05-07T11:59:04+5:30

पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची ईशा पाटीलला ९७.३३ गुण

Girls stack in Class X examination | धुळ्यात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

धुळ्यात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

Next
ठळक मुद्देनिकालाची परंपरा यावेळीही कायमयशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी केले कौतुक

आॅनलाइन लोकमत
धुळे-सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यात धुळे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी ईशा कपिल पाटील हिने ९७.३३ टक्के गुण मिळविले आहे. परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम इशा कपिल पाटील (९७.३३), द्वितीय पलक राजेश अग्रवाल (९६.५०), तृतीय कुमार यश संजय (९६), चतुर्थ मानके कृष्णा संजय (९५.८३) व पाचवा क्रमांक धनश्री नरेंद्र पाटील (९५.५०) हिने मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य भूषण उपासनीसह शिक्षकांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय विद्यालय
नगावबारी चौफुली येथील केंद्रीय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातून परीक्षेसाठी ३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात आदिती बाळासाहेब गणपाटील हिने ५०० पैकी ४६७ गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ९२.४ टक्के मिळाले. तर मंजीरी बिºहाडे (९१.४), कामिनी प्रवीण अहिरे (९०), चतुर्थ पलक कुमरावत (९०) हर्षदा प्रमोद धाकड (८८.२) यांनीही यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या अर्चना श्रीवास्तव, शिक्षक सत्येंद्र कुमरावत, गणेश खेडकर, आसाराम चौधरी, सावरमल जांगीड, मनीष सेनवाल आरीफ शेख, कैलास पवार, तबस्सुम अन्सारी, प्रिती सिंह यांनी कौतुक केलेले आहे.
 

Web Title: Girls stack in Class X examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.