विखरण येथे औष्णीक प्रकल्पासाठी संपादित केलेले जमिनीचे क्षेत्र वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:29 PM2018-03-16T17:29:04+5:302018-03-16T17:29:04+5:30

मागणी : शेतक-यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

Exclude the area of ​​land that was edited for the thermal power project in Vikharan | विखरण येथे औष्णीक प्रकल्पासाठी संपादित केलेले जमिनीचे क्षेत्र वगळा

विखरण येथे औष्णीक प्रकल्पासाठी संपादित केलेले जमिनीचे क्षेत्र वगळा

Next
ठळक मुद्देमौजे विखरण येथे संबंधित औष्णीक प्रकल्पासाठी संपादीत जमीन व त्याचा निवाडा करण्याची कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी शेतकºयांना सांगितले. त्यामुळे शेतकरी ज्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्याबाबत शेतकºयांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखरण देवाचे येथे औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादीत गट क्रमांक ३३६,  ३३८ व अन्य गटातील जमिनीचे क्षेत्र वगळावे, अशी मागणी शुक्रवारी विखरण येथील काही शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनेही केली. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मौजे विखरण येथे औष्णीक विद्युत प्रकल्पांतर्गत काही गटांची जमीन संपादित करण्यात आली आहे. याबाबत भूसंपादन ४-१ ची नोटीस संबंधित शेतकºयांना प्राप्त झाली आहे. या शेतजमिनीवरच संबंदित शेतकºयांचा उदरनिर्वाह होत असल्याने संबंधित शेत जमीन यातून वगळून द्यावी; अशी मागणी निवेदनाद्वारे नमूद करण्यात आली आहे. यावेळी मोतीराम पाटील, धर्मराज पाटील, किशोर भरत पाटील, सदाशिव धर्मराज पाटील, भीमराव श्रावण पाटील, नथ्थू शिंदे, विजय दादाजी पाटील, शिवाजी रामदास पाटील, नानाभाऊ पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते. 
आत्महत्येचा इशारा 
प्रस्तावित औष्णीक प्रकल्पासाठी जी जमीन संपादीत करण्यात आली आहे. या शेतजमिनीवरच  विखरण येथील काही शेतकºयांचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे संपादित केलेले क्षेत्र हे शेत जमिनीतून वगळावे. अन्यथा उदरनिर्वाहासाठी शेतजमीन व मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. 

Web Title: Exclude the area of ​​land that was edited for the thermal power project in Vikharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.