दमदार पावसामुळे शेतांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:33 AM2017-07-20T00:33:02+5:302017-07-20T00:33:02+5:30

शेतकरी चिंतेत : मका, कपाशी पिकाचे नुकसान; साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात पावसाची प्रतीक्षा

Due to heavy rains, the water entered the fields | दमदार पावसामुळे शेतांमध्ये शिरले पाणी

दमदार पावसामुळे शेतांमध्ये शिरले पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : धुळे तालुक्यातील नेर परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकºयांच्या शेतात पाण्याचे तळे साचले आहे. परिणामी, मका, कपाशीचे नुकसान झाले असून येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
जून महिन्यात धुळे तालुक्यात पावसाने हजेरी दिली होती. त्यानंतर त्याने दडी मारली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार शेतकºयांनी दुबार पेरणीही केली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे पाऊस कधी येणार? याकडे शेतकरी आस लावून बसले होते.
दमदार पावसाने दाणादाण
मंगळवारी दुपारी नेरसह खंडलाय, शिरदाणे, भदाणे, लोणखेडी या गावांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे ग्रामस्थांची एकच दाणादाण उडाली. नेर परिसरात सलग दोन तास झालेल्या पावसामुळे गावातील रमेश महादू माळी, साहेबराव गवळे, संजय पाटील, दादाभाई भदाणे, भानू माळी आदी शेतकºयांचे नुकसान झाले.
शेतकºयांनी व्यक्त केली नाराजी
मुसळधार पावसात कपाशी व मका पिकाचे नुकसान नेर परिसरात झाल्यानंतर मंगळवारी दिवसभरात पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी न फिरकल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रात्री उशिराने वाहतूक पूर्ववत
धुळे तालुक्यातील लामकानी व चिंचवार परिसरातही जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे चिंंचवर गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या पुलावरून पावसाचे पाणी गेले होते.
परिणामी, धुळे व लामकानी गावाकडे जाणारी वाहने या पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. मंगळवारी रात्री उशिरा पुलावरील पाणी ओसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
धुळे जिल्ह्यात पाऊस असा : (कंसात आतापर्यंत झालेला पाऊस)
गेल्या २४ तासात धुळे तालुक्यात १६ मि.मी. (२४७), साक्री २ मि.मी.(२८१), शिरपूर १८ (२५९) व शिंदखेडा ६ मि.मी. (१९० ) पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस शिंदखेडा तालुक्यात तर सर्वाधिक पाऊस साक्री तालुक्यात झाला आहे.

दमदार पावसामुळे शेतकºयांवरील दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले आहे. या पावसाने ओडे नाले वाहून निघाले आहे. परंतु, शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
    - सुनील सीताराम भागवत, शेतकरी, नेर

शेतात प्रचंड पाणी साचले असून मोठे नुकसान झाले आहे. अक्षरश: शेतात पाण्याचे तळे साचल्यामुळे पुन्हा पेरणी करण्याची वेळ आलेली आहे.    
    - धनराज परदेशी, शेतकरी, नेर

पावसाअभावी पिके कोमेजू लागली
निजामपूर :  साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे व माळमाथ्यावरील ब्राह्मणवेल, निजामपूर, दुसाणे महसुली मंडळात आषाढी एकादशीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने पावसाअभावी पिके कोमेजू लागली असून येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. पाऊस नसल्याने बुराई नदीच्या उगमापासून तर बुराई धरणापर्यंत सर्वत्र ठणठणाट दिसत आहे. यंदा एकदासुद्धा पूर गेलेला नाही. नदी पूर्णत: कोरडी आहे. बुराईला पूर गेल्यावरच नदी काठावरील शेतातील विहिरींना पाणी येते. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याची प्रतिक्रिया शिवलाल ठाकरे यांनी दिली आहे. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाची आकडेवारी बरी असली तरीदेखील निजामपूर, जैताणे, खुडाणे, आखाडे, रुणमळी, उभरांढीसह परिसरातील अनेक गावांचे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.

Web Title: Due to heavy rains, the water entered the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.