धुळे येथे   दिव्यांगाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत बिºहाड आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 03:30 PM2019-01-24T15:30:28+5:302019-01-24T15:31:57+5:30

आंदोलनात शेकडो दिव्यांगाचा सहभाग

In the Dhule there are various demands of Divyanga for non-stop movement | धुळे येथे   दिव्यांगाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत बिºहाड आंदोलन सुरू

धुळे येथे   दिव्यांगाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत बिºहाड आंदोलन सुरू

Next
ठळक मुद्देसकाळपासून दिव्यांगाचे आंदोलन सुरूग्रामपंचायत विभागाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांशी केली चर्चाआंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम

आॅनलाइन लोकमत
धुळे : ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून २०११ ते १७ पर्र्यंतचा तीन टक्के व आता पाच टक्केचा निधी मिळावा, ज्या ग्रामसेवकांनी हा निधी देण्यास टाळाटाळ केली, त्यांची चौकशी करून कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी आज सकाळपासून   जेलरोडवरील क्युमाईन क्लबसमोर बेमुदत बिºहाड आंदोलनास सुरूवात केली आहे. हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वसंत बोरसे करीत आहेत. 
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतींना स्वउत्पन्नातून दिव्यांगासाठी २०११पासून २०१७पर्यंत ३ टक्के तसेच चालू वित्तीय वर्षात पाच टक्के रक्कम राखीव ठेवून त्यांच्यावर त्याच वित्तीयवर्षी खर्च करावा. ग्रामपंचायतीने एखाद्या आर्थिक वर्षात दिव्यांगासाठीचा राखीव निधी खर्च केला नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अपंग विभागात त्यावर्षीचा निधी जमा करावा असा आदेश आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक त्यानुसार काम करीत नाही. दिव्यांगाना चांगली वागणूक देत नाही. माहिती विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे देतात. त्यामुळे दिव्यांगाना शाररिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. 
दिव्यांगावरील अन्याय दूर करण्यासाठी  जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी आज सकाळपासून क्युमाईन क्लबसमोर बेमुदत बिºहाड आंदोलनास सुरूवात केली. 
अधिकाºयांची भेट
दिव्यांगानी बिºहाड आंदोलन सुरू करताच त्याची दखल जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.  यावेळी समाजकल्याण विभागाच्या अधिकाºयांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.  मात्र मागण्यामान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.



 

Web Title: In the Dhule there are various demands of Divyanga for non-stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे