धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:33 AM2018-02-18T11:33:21+5:302018-02-18T11:34:47+5:30

पाच भरारी पथकांची नियुक्ती, नऊ संवेदनशील केंद्र

In Dhule district, 56 thousand students are admitted for Class X and XII | धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देपाच भरारी पथकांची नियुक्तीजिल्ह्यात ९ संवेदनशील केंद्रपोलिस बंदोबस्त तैनात करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात
येणाºया दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता बारावीसाठी २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर इयत्ता दहावीसाठी ३० हजार ४७८ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५६ हजार ३३३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ या कालावधित होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या कालावधित होणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
बारावीसाठी २५ हजार ८८५ तर दहावीसाठी ३० हजार ४७८ असे एकूण ५६ हजार ३३३ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.
बारावीसाठी ४४ केंद्र
जिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ७  असे एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
दहावीसाठी ६३ केंद्र
इयत्ता दहावीची एकूण ६३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३,  धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, व शिंदखेडा तालुक्यात ११  अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
एक-एक केंद्राची भर
गेल्यावर्षी  ४३ केंद्रावर  बारावीची परीक्षा झाली होती. यावर्षी शिंदखेडा तालुक्यात एका केंद्राची भर पडली.त्यामुळे एकूण केंद्राची संख्या ४४ झाली.  तर दहावीसाठी गेल्यावर्षी ६२ केंद्रे होती. यावर्षी साक्री तालुक्यातील एका केंद्राची भर पडलेली आहे. त्यामुळे दहावीच्या केंद्राची संख्या आता ६३ झाली आहे.
पाच भरारी पथकांची नियुक्ती
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून पाच  भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, डायटच्या प्राचार्या यांचा समावेश असणार आहे.
आठ ठिकाणी कस्टडी
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये  धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी २ कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात ९ संवेदनशील केंद्र
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी   पाच संवेदनशील परीक्षा केंद्रे आहेत. यात धुळे शहर १, धुळे तालुका २ साक्री व शिंदखेड्यात प्रत्येकी एक-एक संवेदनशील केंद्राचा समावेश आहे. तर दहावीसाठी चार संवेदनशील केंद्रे असून त्यात धुळे तालुका १, साक्री तालुका २, शिंदखेड्याच्या एक केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यात दहावी, बारावीसाठी एकही संवेदनशील केंद्र नाही. तर दहावीसाठी धुळे शहरात एकाही संवेदनशील केंद्र नाही.
परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यात येतील.२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षेसंदर्भात पुन्हा आढावा घेणार आहेत.
                       -प्रविण अहिरे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)



 

Web Title: In Dhule district, 56 thousand students are admitted for Class X and XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.