कार-दुचाकी अपघातात छडवेलच्या शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:54 PM2017-11-23T14:54:35+5:302017-11-23T14:55:38+5:30

 वासदरे घाटात गुरूवारी सकाळी घडलेली घटना

Death of a teacher in a car-bike accident | कार-दुचाकी अपघातात छडवेलच्या शिक्षकाचा मृत्यू

कार-दुचाकी अपघातात छडवेलच्या शिक्षकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे- निजामपूर भागातील वासदरे घाटातील दुर्घटना- ठार झालेले शिक्षक हे पंचायत समिती सदस्य- रुग्णालयात नेत असताना वाटेतच झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर,ता. साक्री : कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात   छडवेल येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक तथा साक्री  पंचायत समिती सदस्य पी.एच. पवार (५३) यांचा  मृत्यू झाला.   हा अपघात गुरूवारी  सकाळी ७ वाजेच्या सुमारास  निजामपूर परिसरात वासदरे घाटात झाला. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पी.एच. पवार (५३) हे तालुक्यातील छडवेल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. ते आज सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १८-एस.९२८९) छडवेल येथे जात होते. वाटेत निजामपूर भागातील वासदरे घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाºया कारने (क्र. जी.जे.५- २५०३) जोरदार धडक दिली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना साक्री रूग्णालयात नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.    ते साक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य होते. पी.एच. पवार हे मूळचे कासारे येथील रहिवासी होते.  या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

Web Title: Death of a teacher in a car-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.