धुळ्यात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:34 PM2018-08-20T18:34:31+5:302018-08-20T18:36:01+5:30

जुने धुळे भागातील घटना : पोलिसांचा बंदोबस्त तैनात

A clash with the Kanubai mother's immersion rally in Dhule | धुळ्यात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत हाणामारी

धुळ्यात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत हाणामारी

googlenewsNext
ठळक मुद्देजुने धुळे भागातील घटनादोन गट आमने सामने भिडलेपोलिसांचा बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : डीजेवरील गाण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील जुने धुळे भागात दुपारी उशिरा घडली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आझादनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ यावेळी जमावाकरुन एका दुचाकीची तोडफोडही झाली आहे़ 
दरवर्षाप्रमाणे यंदाही कानुबाई मातेचा उत्सव जुने धुळे भागात उत्साहाने साजरा करण्यात आला़ रविवारी प्रतिष्ठापना केल्यानंतर सोमवारी दुपारी कानुबाई मातेच्या मुर्तीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली़ यावेळी डीजेचे वाद्य लावण्यात आले होते़ दुसºया गटाकडून मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला़ घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते़ यावेळी जमावाकडून एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ 

Web Title: A clash with the Kanubai mother's immersion rally in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.