शहरात अडीच वर्षात ४ हजार नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:53 AM2018-02-14T11:53:41+5:302018-02-14T11:54:40+5:30

मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष, मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणाची मागणी

In the city for only two and a half years, there are four thousand citizens | शहरात अडीच वर्षात ४ हजार नागरिकांना श्वानदंश

शहरात अडीच वर्षात ४ हजार नागरिकांना श्वानदंश

Next
ठळक मुद्देसंपूर्ण शहरात मोकाट श्वानांची दहशतअ‍ॅन्टी रेबीज लसीकरणावर अडीच वर्षात २० लाख खर्चमोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात अडीच वर्षात तब्बल ४ हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याचे समोर आले आहे़ संपूर्ण शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली असून त्यांच्या निर्बिजीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांनी महापौर व आयुक्तांकडे केली आहे़
शहरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून मागील अडीच वर्षात ४ हजार नागरिकांना श्वानदंश झाला आहे़ तर अ‍ॅन्टी रेबिज लसीकरणावर अडीच वर्षात २० लाख रूपयांचा खर्च झाला आहे़ श्वानदंश झालेल्यांमध्ये अनेक वृध्द नागरिक, लहान बालकांचा समावेश आहे़ प्रत्येक भागात मोकाट श्वानांच्या झुंडी दिसून येतात़ रात्रीच्या वेळी तर शहरातून फेर-फटका मारणे धोक्याचे होऊन बसले आहे़ रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येणारे नागरिक, कामावरून घरी परतणारे कामगार यांना मोकाट श्वानांच्या दहशतीचा सामना करावा लागतो़ शिवाय वाहने चालवित असतांना अचानक रस्त्यात श्वान आल्यास वाहनाला अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत़ तरी देखील मोकाट श्वानांच्या समस्येकडे मनपा आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्यात यावे, अशी मागणी शिवेसेनेच्या विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, महानगरप्रमुख सतिश महाले, संजय गुजराथी, गंगाधर माळी, नरेंद्र परदेशी, प्रशांत श्रीखंडे, जोत्स्ना पाटील, मनिषा महाले, सारिका अग्रवाल, मुक्ता गवळी, हिराबाई ठाकरे यांनी महापौर कल्पना महाले व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे़

Web Title: In the city for only two and a half years, there are four thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.