ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:54 AM2019-05-10T11:54:51+5:302019-05-10T11:55:56+5:30

शिक्षक भारती संघटनेने दिले होते निवेदन

Citizen's orders for giving pre-pay monthly salary to the teachers | ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Next
ठळक मुद्देईद साजरी करण्यासाठी वेतन लवकर करण्याची होती मागणीशिक्षणाधिकाºयांनी वेतन अधीक्षकांना दिले आदेश

आॅनलाइन लोकमत
धुळे : रमजान सणानिमित्त जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी काढण्यात यावेत, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी वेतन पथक अधीक्षकांना दिले आहे.
मुस्लीम बांधवांचा रमजान सण सुरू झालेला आहे. येत्या ५ जून रोजी ईद सण साजरा केला जाणार आहे. मुस्लीम बांधवांना हा सण साजरा करावयाचा आहे. त्यामुळे मे २०१९ चे वेतन १ जून पूर्वी देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेने (उर्दू व महिला आघाडी विभाग) यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांना ८ मे रोजी दिले होते.
या संदर्भात शिक्षणाधिकाºयांनी माध्यमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षकांना पत्र देवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी देण्याचे आदेश दिले आहेत.
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, शैलेश धात्रक, सचिन मोरे, हर्षल पवार, सी.टी.पाटील, कानिफनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Citizen's orders for giving pre-pay monthly salary to the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.