२ ते ९ एप्रिलदरम्यान दाखल करता येणार उमेदवारी अर्ज, १२ पर्यंत घेता येईल माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:09 PM2019-03-11T22:09:34+5:302019-03-11T22:09:52+5:30

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली

Candidates can file nominations from 12th to 9th April, up till 12th | २ ते ९ एप्रिलदरम्यान दाखल करता येणार उमेदवारी अर्ज, १२ पर्यंत घेता येईल माघार

dhule

Next

धुळे : लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघासाठी २ ते ९ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० रोजी छाननी आणि १२ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. निवडणुकीसाठी ९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ (नाशिक), उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण, धुळे उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, शिरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुचिता भामरे, चंद्रजित राजपूत (मालेगाव) आदी अधिकारीही उपस्थित होते.
मतदारसंघात आचारसंहितेचा अंमल सुरू झाला असून तिचा भंग होऊ नये यासाठी ‘सी व्हिजिल’ अ‍ॅप यावेळी खास तयार करण्यात आला आहे. तो प्रत्येकजण मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो. कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर कोणीही त्याचा फोटो अथवा व्हीडीयो काढून या अ‍ॅपवर डाऊनलोड करू शकतो. तक्रारही करता येईल. तसेच त्या तक्रारीचे कसे निराकरण केले जात आहे, याची माहितीही तक्रारकर्त्यास मिळेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
जिल्ह्यात मतदारांची एकूण संख्या १६ लाख ३६ हजार २३४ एवढी आहे. त्यात ८ लाख ४५ हजार ४१८ पुरूष मतदार तर ७ लाख ९० हजार ७९२ स्त्री मतदार तसेच २४ इतर मतदारांचा समावेश आहे. अनिवासी मतदार (एनआरआय) एकही नाही. मागील दोन निवडणुकींचा आढावा घेतला तर मतदानाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर
यावेळी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी यापूर्वी इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक गावोगावी दाखविण्यात आले आहे. अजून याबाबत जनजागृती केली जाईल.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ६३२ बॅलेट युनिट आणि प्रत्येकी २ हजार ११२ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे तसेच त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात बॅटऱ्याही प्राप्त झाल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रे
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रे असून १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्या केंद्रांवरच सहाय्यकारी मतदान केंद्र तयार केले जाणार आहेत. सध्या अशा मतदान केंद्रांची संख्या ६९ एवढी आहे. ९ एप्रिलनंतर कदाचित या संख्येत वाढ होऊ शकेल. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. १ जानेवारी रोजी १८ वर्ष पूर्ण केलेल्या युवक, युवतींना नोंदणी करता येणार आहे.
९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणीची संधी
युवक तसेच यापूर्वी नोंदणीपासून वंचित राहिलेले नागरिक येत्या ९ एप्रिलपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करू शकतील. तसेच या मुदतीत नोंदणी करणाºया मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येईल, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विशेष नोंदणी मोहिमांदरम्यान झालेल्या नोंदणीत २५ टक्के युवा मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल, असा विश्वास व्यक्त झाला.
बंदोबस्ताचेही नियोजन
ही निवडणूक सुरक्षित व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बाहेरून जेवढा स्टाफ मागवावा लागेल, त्याची माहितीही देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तसेच राखीव मनुष्यबळही उपलब्ध असल्याचे रेखावार यांनी सांगितले.
पदाधिकाºयांची वाहने जमा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्यात आली आहेत. त्यांची फोन सुविधाही थांबविण्याची सूचना केली आहे. मात्र अगदी गरजेवेळी वाहन उपलब्ध करण्याची सूचनाही केली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. कायदा सुव्यवस्थेसाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Candidates can file nominations from 12th to 9th April, up till 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे