धुळ्यात भाजप सत्तेच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:26 PM2018-12-10T12:26:07+5:302018-12-10T12:29:04+5:30

कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडीत झाली घसरण, शिवसेनेचीही मुसंडी

BJP at Dhule in Dhule | धुळ्यात भाजप सत्तेच्या दारात

धुळ्यात भाजप सत्तेच्या दारात

Next
ठळक मुद्देभाजपाने ३७ जागांवर घेतली आघाडीनिकालाची शहरात प्रचंड उत्सुकतालोकसंग्रामची आघाडी तीन वरून दोनवर आलेली आहे.

आॅनलाईन लोकमत
धुळे- महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  भाजपने ३७ जागांवर आघाडी घेतली असून, हा पक्ष सत्तेच्या दारात असल्याची चर्चा आहे. तर कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसची आघाडी २८ वरून १४ जागांवर आलेली आहे. अद्याप एकही जागेचा निकाल हाती आलेला नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय गोदामात सुरू झालेली आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत  हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाने आतापर्यंत ३७ जागांवर आघाडी घेत या पक्षाने सत्तेच्या दारापर्यंत मजल मारली आहे. त्यांना बहुमतासाठी अवघ्या एका जागेवर आघाडी मिळणे गरजेचे आहे. दरम्यान सुरवातीला कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपच्या पाठोपाठ २८ जागांवर आघाडी घेतली होती. परंतु या पक्षांना ही आघाडी कायम ठेवता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेनेने मात्र तीन जागांवरून ७ जागांवर आघाडी घेत चांगलीच मुसंडी मारलेली आहे. लोकसंग्रामची आघाडी तीन वरून दोनवर आलेली आहे. याशिवाय इतर तीन जणांनीही आघाडी घेतली आहे.
निकालाची उत्सुकता- दरम्यान निवडणुकीचे अद्याप आघाडीच जाहीर होत असून, अधिकृत निकालाची शहरात प्रचंड उत्सुकता लागून आहे. शहरातील चौकाचौकात निवडणुकीच्या कौलबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.


 

Web Title: BJP at Dhule in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.