२७ वर्षानंतर नवा रेकॉर्ड धुळ्याचा पारा २़२ अंशावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:11 PM2018-12-29T12:11:17+5:302018-12-29T12:12:07+5:30

१९९१ : झाली होती २.३ अंश तापमानाची नोंद 

After 27 years, the new record of Dhulal will be 2 to 2 degrees | २७ वर्षानंतर नवा रेकॉर्ड धुळ्याचा पारा २़२ अंशावर 

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील तापमानात पुन्हा घट झाली असून नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला असून शनिवारी सकाळी २.२ अंश तापमानाची नोंद झाली. यापूर्वी ३ जानेवारी १९९१ रोजी २.३ अंश तापमानाची नोंद झाली होती़ २७ वर्षानंतर तापमानाचा नवा रेकॉर्ड झाला. या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद कृषी महाविद्यालयात आहे़ गेल्या चार दिवसांपासून तापमानात सातत्याने घसरण होत आहे. 
तापमानात घट होत असल्याने शहर परिसरात सकाळी आणि रात्रीच्यावेळी ऊब मिळविण्यासाठी सर्वसामान्यांकडून शेकोट्या पेटविल्या जात आहेत. उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी शहरातील तिबेटी बांधवांच्या दुकानांसह अन्य विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. सकाळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची पालकांकडून विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. स्वेटर, कानटोपी, मफलर, कोट या उबदार  कपड्यांना मागणी वाढली आहे.  थंडीचे दिवस असल्याने मॉर्निंग वॉक करणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून पहाटेपासूनच फिरणारे मोठ्या प्रमाणात दिसतात़ गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या वाढतीच आहे़ व्यायाम करणाºयांची संख्या देखील वाढत आहे़  
थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर फरक पडला आहे़ थंडीत वाढ झाल्याने नागरिक कामाशिवाय रात्री घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत़ गुरुवारपासून दिवसाही   गार वारे वाहत असल्याने तापमानात ही घसरण झाल्याचे सांगण्यात आले. 
थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी दिवसभर गरम कपडे परिधान करण्यास प्राधान्य दिले़ सकाळी कोवळ्या उन्हात थांबणे पसंत केले जात आहे.  थंडीमुळे वाहतुकीच्या वर्दळीवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. 

Web Title: After 27 years, the new record of Dhulal will be 2 to 2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे