व्यावसायिकाच्या घरात चोरी करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:06 AM2019-06-04T02:06:39+5:302019-06-04T02:06:44+5:30

सायनमधील घटना : मुद्देमाल जप्त

Theft arrester in the house of a businessman | व्यावसायिकाच्या घरात चोरी करणारे अटकेत

व्यावसायिकाच्या घरात चोरी करणारे अटकेत

Next

मुंबई : सायन येथे व्यावसायिकाच्या घरातून रिव्हॉल्व्हरसहित ४२ जिवंत काडतुसे आणि दागिने चोरी करणाऱ्या त्रिकूटाला सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हरसहित ४२ जिवंत काडतुसे जप्त केली असून उर्वरित मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत.

शिवनेरी को-ऑप. हाउसिंग सोसायटीत कीर्तीकुमार काशिनाथ करंजे (५१) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. कीर्तीकुमार हे व्यावसायिक आहेत. मुलाला शाळेला सुटी असल्याने ते गावी साताराला गेले होते. सोने-चांदीचे दागिने तसेच ३२ बोअरची रिव्हॉल्व्हर व ४२ जिवंत काडतुसे त्यांच्या कपाटात होती. ती चोरांनी लंपास केली.

या प्रकरणी सायन पोलिसांनी लिफ्ट मेकॅनिक असलेला संतोष उर्फ जग्या प्रदीप शंभरकर (३१), सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा बाबू जमालउद्दिन खान (३५)सह गणेश उर्फ मामा उलगाप्पा वैद्य (४७) यांना अटक केली.

म्हणून रिव्हॉल्व्हर चोरी
घरफोडीदरम्यान यापैकी एकाने भीती दाखविण्यासाठी रिव्हॉल्व्हरची चोरी केली. अन्य दोघांनी त्याला रिव्हॉल्व्हर तेथेच ठेवण्यास सांगितले होते; मात्र त्याने ठेवले नसल्याचेही तपासात समोर आले.

Web Title: Theft arrester in the house of a businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.