स्पा सेंटर मालकाने तरुणीचे केले लैंगिक शोषण तर मॅनेजरने केलं अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:49 PM2022-03-16T19:49:13+5:302022-03-16T19:50:10+5:30

Sexual Abuse : पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, मुळची हरियाणाची असलेल्या या तरुणी पतीपासून विभक्त आहे.

The owner of the spa sexually abused the girl while the manager committed obscene acts | स्पा सेंटर मालकाने तरुणीचे केले लैंगिक शोषण तर मॅनेजरने केलं अश्लील कृत्य

स्पा सेंटर मालकाने तरुणीचे केले लैंगिक शोषण तर मॅनेजरने केलं अश्लील कृत्य

Next

जळगाव :  रिंग रोडवरील सी सल्ट स्पा सेंटरमध्ये कामाला असलेल्या हरियाणाच्या २८ वर्षीय तरुणीवर मालकाने अत्याचार तर मॅनेजरनेही अश्लिल कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलिसात मालक दत्तू लक्ष्मण माने (रा.नाशिक) याच्याविरुध्द बलात्कार तर मॅनेजर दीपक बडगुजर व पंकज जैन यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, मुळची हरियाणाची असलेल्या या तरुणी पतीपासून विभक्त आहे. तिला तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. दिल्लीत असताना ती कामाच्या शोधात होती. त्यावेळी आसामच्या एका मैत्रिणीने जळगावात काम असल्याचे तिला सांगितले. त्यानुसार ही तरुणी नोव्हेंबर २०२१ मध्ये जळगावात आली. रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरमध्ये तिला ग्राहकांची मसाज करण्याचे काम मिळाले होते.

Web Title: The owner of the spa sexually abused the girl while the manager committed obscene acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.